लातूर : प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक ३ मधील नागरी समस्या घेऊन नागरीक महापालिका अधिका-यांच्या दालनामध्ये पोहोचले असता अधिकारी निवेदन स्वीकारायला तयार नाहीत म्हणून महापालिकेच्या दारामध्ये ठिय्या आंदोलन चालू केले. आंदोलन करूनही डोळे नाही उघडल्यामुळे झोपून आंदोलन केले. त्यानंतर तब्बल ३ तासानंतर महापालिकेला बँड वाजवुन महापालिका अधिका-यांना जाग करावे लागल्यानंतर त्यांनी महापालिकेचा अधिकारी पाठवून नागरीकांचे निवेदन स्वीकारले.
महापालिकेचे उपआयुक्त यांच्या सोबत चर्चा घडवून आणली. या चर्चेमध्ये मस्तावलेल्या अधिका-यांची बाबतीमध्ये आयुक्तांना माहिती देऊन प्रभाग क्रमांक ३ मधल्या महापालिकेच्या बोरच्या किरकोळ पाईपलाईनच्या दुरुस्त्या, महापालिकेच्या स्टेट लाईटच्या दुरुस्त्या करून चालू करणे, मोकाट फिरणा-यो कुत्र्यांचा बंदोबस्त करणे, महादेव नगर मस्जिद बाजूस असलेला कचरा व प्रभागात इतरही मस्जिद, मंदिर जवळील कचरा वेळोवेळी उचलणे, राजीवनगर येथील शौचालय दुरुस्त करून चालू करून देणे. या सर्व अडचणी बाबतचे निवेदन उपायुक्त खानसुळे यांना देण्यात आले. या निवेदनावर लवकरात लवकर कारवाई जर नाही झाली तर महापालिकेवर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा पालिका अधिका-यांना देण्यात आला. यावेळी प्रभागातील नागरिक व सर्व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काँग्रेस पक्षाचे शहर सचिव विकास कांबळे यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन करण्यात आले. यावेळी बालाजी चवरे, विश्वास आंबेकर, गोविंद केंद्रे, अजय आडगळे, देविदास गायकवाड, काशिनाथ वाघमारे, प्रकाश पाटोळे, महादू गायकवाड, खंडू सुरवसे, शिवलिंग कांबळे, अजय सोमवंशी, उमेश मस्के, सय्यद इल्यास, सचिन शिंदे, प्रकाश सुरवसे, राहुल मस्के, सुनील समूखराव, शंकर कांबळे, संजूभाऊ गव्हाणे, भगवान कांबळे, महादू कांबळे, लखन उबाळे, गौतम वाळवी, विनोद क्षीरसागर, बादल जाधव, आकाश पाटोळे, साधू मोरे, अजय रणदिवे, सोनू कांबळे, राम कांबळे, सुनील वाघमारे, रमेश कांबळे, धीरज गायकवाड, शुभम जोगदंड, सुरज माटे, रोहित सरवदे, इस्माईल शेख, अनिकेत कांबळे, अजय कांबळे, रवी मस्के, संजू मस्के, महेश हनुमंत, गणेश जाधव, अमोल गव्हाणे, सुमित कांबळे, आदी नागरिक व विकास कांबळे यांचे सहकारी उपस्थित होते.

