महायुतीत जागावाटपाचा तिढा कायम!

शिंदेंची पुन्हा दिल्ली वारी, दिल्ली दरबारी पेच सुटणार?
मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. खासकरून जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. काही जागांवर सर्व पक्षांचे एकमत झालेले आहे. मात्र काही जागांवर शिवसेना आणि भाजप अशा दोन्ही पक्षांनी दावा केल्याची माहिती समोर आली. अशातच आता जागा वाटपाचा तिढा दिल्ली दरबारी सुटणार असल्याची माहिती समोर आली. कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तडकाफडकी दिल्लीला रवाना झाले आहेत.

विधान परिषदेच्या १७ पैकी ७ जागांसाठी एकनाथ शिंदे आग्रही आहेत. आज सकाळी नंदनवन इथे मंत्री बावनकुळे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सोबत बैठक झाली. यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार ठाणे, संभाजीनगर, जालना, नाशिक या जागेचा काढा कायम असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष करून ठाण्याच्या जागेसाठी शिंदे आग्रही असल्याचे समोर आले. त्यामुळे दिल्लीत पक्ष नेतृत्वाकडे विधान परिषदेच्या जागांचा तिढा सुटणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

विधान परिषद निवडणुकीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातील १७ जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी महायुतीचे जागावाटप अद्याप पूर्ण झालेले नाही. आज सकाळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. मात्र अद्याप भाजप आणि शिवसेना काही जागांवर ठाम असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे आता एकनाथ शिंदे हे दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत जागावाटपाबाबत चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

मलंगगडावरून पुन्हा वाद पेटणार?

मुंबई : मलंगगडावरून पुन्हा वाद पेटण्याची चिन्हं आहेत. मलंगगडावरून...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
नांदेड आगारातून चक्क एसटी बस चोरीचा प्रयत्न; चालकाचे प्रसंगावधान, आरोपी गेटवरच जेरबंद
01:22
Video thumbnail
व्हाईट हाऊसजवळ अंदाधुंद गोळीबार; सुरक्षा दलांच्या प्रत्युत्तरात संशयित हल्लेखोर ठार, ट्रम्प सुरक्षित
01:46
Video thumbnail
निसर्गाची अद्भूत करणी! अवघ्या १२ फुटांवर लागलं पाणी
01:46
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये भाजीपाल्याचे दर गगनाला;गृहिणींचे बजेट कोलमडले
02:05
Video thumbnail
Nanded|नांदेड पोलिसांची मोठी कारवाई; 14 लाखांचा घातक शस्त्रसाठा जप्त
02:39
Video thumbnail
Latur|NEET प्रकरणानंतर प्रशासनाचे डोळे उघडले;“क्लासेस, मेस, हॉस्टेल बंद करण्याचे आदेश
06:48
Video thumbnail
Latur|विश्वजीतची संघर्षगाथा; मृत्यूशी झुंज देत NEET ची तयारी,डोळ्यात अजूनही डॉक्टर होण्याचं स्वप्न
06:21
Video thumbnail
डिझेल टंचाईमुळे जिंतूर तालुक्यात शेतकरी हैराण; बोरी येथील पेट्रोल पंपावर मुक्काम ठोकण्याची वेळ
02:45
Video thumbnail
बिलोली उपजिल्हा रुग्णालयात संतापजनक प्रकार! गॅस संपल्याच्या बहाण्याने किचन बंद; रुग्ण उपाशी ?
04:25
Video thumbnail
राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठा वाघ हल्ला; सिंदेवाही जंगलात ४ महिलांचा जागीच मृत्यू
00:30
Video thumbnail
५ जूननंतर नांदेड शहरात रस्त्यांची कामे होणार नाहीत; मान्सूनपूर्व बैठकीत मनपा आयुक्त यांचे संकेत
02:33
Video thumbnail
मध्यरात्री काळजाचा ठोका चुकला! माहूरच्या बाबा सोनापीर दर्गा परिसरात बिबट्याचे दर्शन
01:48
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|लातुरातील दयानंद महाविद्यालयाच्या परिसरातील नामांकित डॉक्टरची CBI कडून चौकशी सुरू
02:22
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|लातूरमधील औसा रोड परिसरातील नामांकित डॉक्टर सीबीआयच्या रडारवर?
01:52
Video thumbnail
Latur|खंडापूर पादुका दर्शन अपहार प्रकरण; किशोर महाराजांच्या प्रतिमेला जोड्याचा हार, धरणे आंदोलन सुरु
04:10

Latest news