मुंबई : राज्य सरकारने शेतक-यांना कर्जमाफी जाहीर केल्यानंतर आता आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. मागील कर्जमाफी योजनेत राहिलेल्या शेतक-यांनाही आता कर्जमाफी मिळणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी जवळपास १४ हजार कोटी रुपये दिले जाणार आहेत. यामुळे कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतक-यांनाही लाभ मिळणार असून, डोक्यावरील ओझं कमी होणार आहे.
२०१७ आणि २०१९ च्या कर्जमाफीत अनेक शेतकरी अडकले होते. या शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा यासाठी वारंवार मागणी होत होती. यानंतरआज मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
शेतकरी कर्जमाफी योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली. २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीवर शिक्कामोर्तब झाले आहे. पण विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे केवळ घोषणा रखडली. निर्णय झाला असला तरी अधिकृत घोषणा निवडणुकीनंतर होणार असल्याचं सांगितले जात आहे.
















