लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरातील साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चौका नजीकच्या फ्रुट मार्केट परीसरात जाऊन राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दि. ३१ जुलै रोजी सकाळी तेथील व्यवस्थांची पाहणी केली. त्याठिकाणी व्यापारी, फळ विक्रेते, वाहनधारक आणि नागरीक यांच्याशी सुसंवाद साधला, त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी महापालिका प्रशासनाला आवश्यक कार्यवाहीसाठी सूचना केल्या.
माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी फ्रुट मार्केट परीसरात जाऊन तेथील व्यवस्थांची पाहणी केली. त्याठिकाणी व्यापारी, फळ विके्रते, वाहनधारक आणि नागरिक यांच्याशी चर्चा केली. फ्रुट मार्केटमध्ये दररोज नियमितपणे स्वच्छता करावी, या ठिकाणच्या कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र यंत्रणा लावावी, व्यापारी, फळविक्रेते, तसेच नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी पार्किंग व्यवस्थेवर लक्ष द्यावे, या ठिकाणी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उभारावी, फ्रुट मार्केट मध्ये स्वतंत्र स्वच्छतागृहाची उभारणी करुन त्याची नियमित स्वच्छता होईल हे पाहावे आदी सूचना महानगरपालिका प्रशासनाला करुन आगामी काळात फळ विक्रीसाठी येणारे शेतकरी त्याचबरोबर व्यापारी यांच्याशी नवीन अद्यावत फ्रुट मार्केट उभारणी करावी, असेही यावेळी सांगितले
यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, विलास को-ऑपरेटिव बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, लातूर फ्रुट मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष हाजी शबीर, रहेमानसाब बागवान, शब्बीर हाजी, मेहेतासाब बागवान, बरकत हाजी, रहेमानसाब बागवान, विजयकुमार साबदे, इमरान सय्यद, आसिफ बागवान, सचिन बंडापले, अब्दुल्ला शेख, सुलतान शेख, मजीद हाजी, कासीमसाब बागवान, तबरेज तांबोळी, गिरीश ब्याळे, असंघटित कामगार काँग्रेसचे लातूर शहराध्यक्ष तथा महानगरपालिका फेरीवाला समिती सदस्य गौस गोलंदाज, लातूर हातगाडा असोसिएशन सचिव मजीद बागवान, हमीद चाकूरकर, सुलतान शेख, मजीद हाजी, कासिमसाब बागवान, बरकत बागवान, जाकिर बागवान, बडेसाहब शेख, अनवर बागवान, रफिक बागवान, रईस बागवान, आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी फ्रुट व्यापारी आडते हमाल मापाडी उपस्थित
होते.