लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरातील ज्येष्ठ विधिज्ञ कालिदासराव देशपांडे परिवाराच्या वतीने शनिवारी राज्याचे माजी मंत्री, सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मा. दिलीपराव देशमुख व सौ. सुवर्णाताई दिलीपराव देशमुख यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी अॅड. कालिदास देशपांडे, सौ. कामाक्षी कालिदास देशपांडे, सौ. शांभवी देशपांडे यांच्यासह देशपांडे कुटुंबातील मित्र परिवार मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता.
या वेळी श्री. व सौ. आबासाहेब पाटील, सौ. वैद्य ताई, माजी आमदार वैजनाथराव शिंदे, लक्ष्मीरमण लाहोटी, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक काळे, श्रीशैल उटगे, अॅड. आर. आर. देशपांडे, जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष अॅड. वाय. डी. जगताप, डॉ. पी. के. शहा, रमेश बियाणी, अॅड. आशिष बाजपाई, संतोष देशमुख, पत्रकार हरिराम कुलकर्णी, शामराव भोसले, गणपत बाजुळगे, सचिन पाटील, नरसिंह देशमुख, डॉ. बी. आर. पाटील, मधुकर कुलकर्णी, लक्ष्मण पाटील, गोविंद बोराडे, संभाजी सूळ, संजय बोरा, रमेश बिरादार प्राचार्य मोटेगावकर, डॉ. साळुंखे, तात्यासाहेब देशमुख, प्रा. निवृत्ती लोमटे, सरपंच राजाभाऊ लहाडे, अनुप शेळके, प्रा. शशिकांत कदम, बाळासाहेब कदम, आर. बी. जोशी, यांच्यासह रूई, काटगाव येथील नागरिक उपस्थित होते.