26.9 C
Latur
Sunday, July 20, 2025
Homeसोलापूरमानाच्या दहा पालख्यांसाठी २३४ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचे नियोजन : संजय धनशेट्टी

मानाच्या दहा पालख्यांसाठी २३४ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचे नियोजन : संजय धनशेट्टी

सोलापूर- पालखी मार्गावर प्रत्येक यंत्रणेचे ठिकाण ठरलेले आहे. त्यामुळे वारकऱ्यांना सुविधा सहजपणे मिळतात. पाण्याचे टैंकर रिकामे होईल तसे बदलावे लागतात. यासाठी टँकरची जागा फिक्स करणे गरजेचे ठरते. त्यामुळे आता पुढील पालखी सोहळ्यासाठी टैंकरच्या जागा फिक्स करण्यासाठी त्या ठिकाणी फलक लावण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे कार्यकारी अभियंता धनशेट्टी यांनी सांगितले. पालखी सोहळ्याबरोबर मार्गावरून येणाऱ्या वारकऱ्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी पंधरा दिवस आधीपासून तीनवेळा पाणी स्रोतांची टेस्ट केली जाते, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी यांनी दिली.

आषाढीवारी सोहळा काळात पंढरपूरकडे येणाऱ्या मानाच्या पालख्यांसोबत असलेल्या वारकऱ्यांना शुद्ध पिण्याचे पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे आहे. वारकऱ्यांची गर्दी असताना व रस्त्यावर मोठे ट्रैफिक असताना पाण्याचे . टैंकर वाहतूक करून वारकऱ्यांना येण्याचे शुद्ध पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी पाणीपुरवठा विभागाने यशस्वी पार पाडली आहे. कार्यकारी अभियंता धनशेट्टी म्हणाले की, जिल्हा प्रशासनाकडून मानाच्या दोन्ही पालखी सोहळ्यासाठी यंदा२३४ टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला.

यासाठी टँकरमध्ये पाणी भरण्यासाठी ११२ फिडिंग सेंटर व देखरेख ठेवण्यासाठी १४२ कर्मचान्यांची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये पालखी मार्गावरील विहिरी, बोअर अधिग्रहण करण्यात आले होते. ज्या ठिकाणावरून टैंकर मध्ये पिण्याचे पाणी भरले जाणार आहे त्या ठिकाणचे पाणी पिण्यायोग्य आहे का? याची १५ दिवस अगोदर तीन वेळा तपासणी केली जाते.

त्यानंतर प्रत्यक्ष टँकर मध्ये पाणी भरताना टीशियल पावडर व मेडिक्लोरचा उपयोग केला जातो. पालखी सोहळा विसावा व मुकामाच्या ठिकाणी येण्याआधी टँकर तयार ठेवले जातात. रिंगण सोहळ्यावेळी मोठी गदर्दी होते. गर्दीतून टैंकर काढून ठरलेल्या ठिकाणी पोहोच करणे जबाबदारीचे काम असते. पालखी सोहळयाबरोबर पुण्याहूनही काही टँकर आलेले असतात, टँकर गदीतून मार्ग काढत जात असताना वाहतूक पोलिसांचेही मोठे सहकार्य लाभते. शुद्ध पाणीपुरवठ्यावर देखरेख करण्यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारीही काम करीत असतात.

पंढरपूर विभागीय कार्यालयाच्या माध्यमातून ११ उप अभियंते टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी लक्ष ठेवून होते दोन्ही पालख्या वाखरीतळावर आल्यानंतर मोठी गर्दी होते. या गर्दीतून पाण्याचे टँकर बाहेर काढण्यासाठी नियोजन करावे लागते. एमआयटी कॉलेज ते पालखीतळ व कराड-सातारा रोडवर या काळात पिण्याचे टँकर उभे केले जातात.ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला जिल्ह्यात विविध ठिकाणाहून प्रवेशित होणाऱ्या मानाच्या दहा पालख्यांसाठी पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात आले. यामध्ये २०० सरकारी तर खाजगी ३४टँकर उपलब्ध करण्यात आले होते. संपूर्ण पाणीपुरवठा सुरळीत पार पाडण्यासाठी उपकार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, सहाय्यक प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे, रणजीत घोडके, रवींद्र करजगीकर, प्रवीण चव्हाण यांनी परिश्रम घेतले

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR