मुंबई : प्रतिनिधी
निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे २४ नगराध्यक्ष आणि २०४ नगरपालिका सदस्यांची निवडणूक लांबणीवर गेल्याने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली आहे. निवडणूक रद्द केल्याप्रकरणी त्यांनी निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना पत्र लिहून आपली नाराजी बोलून दाखवली आहे. मतदानाला एक दिवस शिल्लक असताना निवडणुका स्थगित करणे अयोग्य असल्याचे भाजपचे मत आहे.
राज्यातील जवळपास २४ नगराध्यक्ष आणि २०४ नगरसेवक पदांची पुन्हा निवडणूक घेण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. यामुळे याठिकाणी गोंधळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक १९६६ मधील नियम १७(१) आणि राज्य निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबर २०२५ रोजी काढलेले सहपत्र आणि २९ नोव्हेंबर २०२५ रोजी दिलेले सुधारित निर्देश यामधील समन्वयाचा अभाव राज्य निवडणूक आयोगाने लक्षात घ्यावा असे आवाहन रविंद्र चव्हाण यांनी केले आहे.

