लातूर : प्रतिनिधी
पुणे डिस्ट्रीक क्युवान की डू असोसिएशनच्या वतीने नागपूर येथे झालेल्या ३ -या महाराष्ट्र स्टेट लेव्हल क्युवान की डू चू्म्पीयनशीप स्पर्धेत लातूरची कन्या खुशी अविनाश बट्टेवारी हिने सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करीत सुवर्णपदक पटकावले.
खुशी बट्टेवारला सदर सुवर्णपदक क्युएएमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जाबीर शेख, चेअरमन पियूश अंबलकर, उपाध्यक्ष डॉ. चितान शेट्टी, जनरल सेक्रेटरी इक्बाल शेख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. खुशीच्या या यशात अहमद शेख, कलीम शेख यांनी परिश्रम आहेत. या यशाबद्दल खुशीचे अविनाश बट्टेवार, सुचिता बट्टेवार, ईश्वर बट्टेवार, सतीश हलवाई, एम. पी. देशमुख, अॅड. सचिन पंचक्षरी, अॅड देविदास बोरुळे-पाटील, मुकेश नंदा, संदीप बिराजदार, रोहित शिरसागर, प्रमोद चिद्रावार, योगेश चिद्रावार यांनी अभिनंदन केले.

