14.7 C
Latur
Friday, November 14, 2025
Homeलातूरलातूर पंचायत समितीत  अभिलेखांची पडताळणी

लातूर पंचायत समितीत  अभिलेखांची पडताळणी

लातूर : प्रतिनिधी
यशवंतराव चव्हाण पंचायत राज जिल्हा अभियान २०२४-२५ (मुल्यांकन वर्ष २०२३-२४) अंतर्गत छत्रपती संभाजी नगर विभागातून पंचायत समिती, लातूर प्रथम आल्याने ग्रामविकास विभाग यांचे पत्र दि. ६ ऑक्टोबर २०२५ अन्वये राज्यस्तरीय पडताळणी समिती गठीत करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने शुक्रवारी पंचायत समिती, लातूर येथे अभिलेख्यांची पडताळणी करण्यात आली. सदर पडताळणी समितीने, यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान २०२३-२४ मध्ये पंचायत समितीने राबविलेल्या योजना व प्रशासकीय बार्बीचे मूल्यांकन प्रश्नावली नुसार तपासणी केली.
सदर समिती मध्ये प्रमुख म्हणून कोकण विभागाचे (विकास) अप्पर आयुक्त डॉ. माणिक दिवे,  समिती सदस्य सहाय्यक आयुक्त डॉ. प्रदिप घोरपडे, लघुलेखक गणेश गांधले, कोकण विभाग, ग्रामविकास कक्ष अधिकारी शुभम घुगे, ग्रामविकास सहायक कक्ष अधिकारी सुनिल माळी हे उपस्थीत होते. तसेच सदर तपासणी वेळी लातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शाम गोडभरले, तालुका पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय अधिकारी डॉ. क्षिरसागर एस.बी. गटशिक्षण अधिकारी शेख चॉद, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. एच. पवार, सहाय्यक गटविकास अधिकारी सतिश चोरमले, उपविभागीय अभियंता एस. जी. कुलकर्णी, धनंजय मुळे, आरोग्य अधिकारी डॉ. पठाण सागिरा, साईनाथ वंगारी, जयमाला माळी, भुजबळ आर.एच., विष्णु पोलकर, शिरूर अनंतपाळचे कक्षाधिकारी चंद्रकांत कदम आदी उपस्थीत होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR