लातूर : प्रतिनिधी
लोकनेते स्व. विलासराव देशमुख यांच्या ७९ व्या जयंती निमित्त मनोधैर्य सेवाभावी संस्था, लातूर यांच्या संयुक्त्त विद्यमाने लातूर जिल्हा बुध्दीबळ संघटना व राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर (स्वायत्त) यांच्यावतीने लोकनेते विलासराव देशमुख चेस चॅम्पियनशीप (एक दिवसीय-खुल्या) जलदगती राज्यस्तरीय बुध्दीबळ स्पर्धाचे दि. २ जून रोजी राजर्षी शाहू महाविद्यालय येथे सकाळी ९.३० वाजता शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य महादेव गव्हाणे, अॅड. बळवंत जाधव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत प्रशांत किरण पिसे व समर्थ पाटील संयुक्तरित्या सर्वोत्तम खेळाडू ठरले. स्पर्धेच्या उद्घाटनाच्या सत्राला लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. किरण जाधव, अॅड. समद पटेल, कैलास कांबळे, ईमराण सय्यद, अॅड. अर्जुन लाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेसाठी पुणे, सातारा, नांदेड, सोलापुर, कोल्हापुर, मुंबई, धाराशिव, सागली, अकोला, अहमदनगर, लातूर आदी जिल्ह्यातून १२० विद्यार्थींची उपस्थिती होती.
लोकनेते विलासराव देशमुख राज्यस्तरीय बुध्दीबळ स्पर्धचे ऐकून ७ फे-या होवून यातील प्रथम क्रमांक येणा-या विद्यार्थांला ११ हजार तर द्वितीय ७ हजार व तृतीय ५ हजार असून एकूण आकर्षक ३० पारितोषिक व २० चषक विद्यार्थांना देण्यात आले. या स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान प्रशांत पिसे, समर्थ पाटील, धिरज उपाडे यांनी पटकावला. तर मुलींमध्ये सविता दत्तात्रय गोरे, दीक्षा सोनवणे, स्वराली भूरे यांनी सर्वोत्तम खेळाडूंचा बहुमान पटकवाला. खुल्या पुरुष गटात ओम लामकाने, विशाल पटवर्धन, आदित्य सावळकर, निहान पोहाने, अभिषेक पाटील, विनित धुत, संदेश बजाज, विहान देशमुख, पुषकर डोंगरे, मयुर गुप्ता, चिन्मय रसल, विवेक रामटेके, आकाश कोळी, राहूल शिंदे, अक्षत कलंत्री, १४ वर्षे वयोगटात श्रेयश कुदाळे, आशिष मोटे, राघव भांदर्गे, १० वर्षे वयोगटात यश चव्हाण, वेदांत पंडेकर, श्लोक चौधरी, तर सर्वोत्तम अनुभवी खेळाडू म्हणून चंद्रकांत पवार, शरद नाईक व विजयकुमार उपासे यांनी बहुमान पटकावला.
लोकनेते विलासराव देशमुख चेस चॅम्पियनशीप २०२४ या (एक दिवसीय खुल्या जलदगती राज्यस्तरीय बुध्दीबळ स्पर्धा) संस्थेचे अध्यक्ष गायकवाड पवनकुमार व उपाध्यक्ष शेख सिराज यांच्या पुढाकारातून होत असून ही स्पर्धा पार पाडण्यासाठी माजी उपमहापौर कैलास कांबळे, माजी नगरसेवक इम्रान सय्यद, शेख सज्जाद, शेख असलम, शेख इरफान, शेख फारुख, शेख महंमद, डी. उमाकांत, शेख ख्वॉजापाशा, सचिन वाघमारे, चाऊस अस्लम, संजय सुरवसे, आकाश मगर, इलीयाज शेख, शेख नय्युम, शेख जब्बार, परिश्रम घेतले.