लातूर : प्रतिनिधी
उदगीर तालुक्यातील तोंडार येथील विलास सहकारी साखर कारखाना युनिट-२ चा गळीत हंगाम शुभारंभ दि. ११ नोव्हेंबर रोजी कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या हस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकुन करण्यात आला.
गळीत हंगाम शुभारंभा प्रसंगी विलास सहकारी साखर कारखान्याकडून खरेदी केलेल्या १० ऊस तोडणी यंंत्रांचे व ऊसाने प्रथम भरुन आलेल्या वाहनांचे मान्यवरांच्या हस्ते विधीवत पूजन करण्यात आले. कारखान्याचे संस्थापक माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेनूसार विलास सहकारी साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने विद्यमान गळीत हंगामात ७ लाख मेट्रीक टन गाळप व १२ टक्के साखर उतारा प्राप्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्या दृष्टीकोनातून कारखान्याने २० ऊस तोडणी यंत्र खरेदी करुन यंत्रणा सज्ज ठेवली आहे.
ऊस उत्पादक शेतक-यांनी ऊस तोडणी यंत्रांकडून ऊसाची तोडणी करुन घेतल्यास कुठलेही नुकसान होत नाही. ऊसाची जमिनीलगत तोड होते व पाचट कुटी पण केली जाते. शेतक-यांनी जास्तीत जास्त ऊस गाळपासाठी विलास कारखान्यास द्यावा, असे आवाहन कार्यकारी संचालक ए. आर. पवार यांनी केले आहे.
यावेळी रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अनंतराव देशमुख, व्हाईस चेअरमन अॅड. प्रविण पाटील, जागृती शुगरचे व्हाईस चेअरमन लक्ष्मणराव मोरे, ट्वेन्टी वन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धनंजय देशमुख, संभाजी रेड्डी, रविंद्र काळे, अमृत हरिश्चंद्र जाधव, संतोष शिंदे, अनंत बारबोले, नरसिंग बुलबुले, गोवर्धन मोरे, रंजीत पाटील, तात्यासाहेब पालकर, हनमंत पवार, रामराव साळूंके, नितीन पाटील, नेताजी साळूंके, रसूल पटेल, सुभाष माने, दीपक बनसोडे, लता देशमुख, कल्याण पाटील, मारुती पांडे, संतोष बिरादार, विनोबा पाटील, पंडित ढगे, गोडभरले, देसाई, येवले, कोळगे, खरात, चांडक, शेख, श्रीराम पाटील आदींसह विभागप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.

