17.3 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeलातूरसंतप्त नागरिकांनी केले अवैध दारूचे दहन

संतप्त नागरिकांनी केले अवैध दारूचे दहन

औसा : प्रतिनिधी
तालुक्यातील  भादा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या औसा तालुक्यातील शिवली येथील संतप्त नागरिकांनी मंगळवारी संध्याकाळी अवैध दारू पकडून जाळून टाकल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी उपस्थित पोलीस कर्मचा-यासमोर वारंवार सांगूनही अवैध दारूची विक्री बंद होत नसल्याचा रोष व्यक्त करीत पोलीसांच्या कर्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
भादा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवली येथे मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू असून या अवैध धंद्यावर कारवाई करण्याची मागणी येथील नागरिकांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे मात्र भादा पोलीसांकडून ठोस कारवाई होत नसल्याने निर्ढावलेल्या अवैध धंदेवाल्याचे मनोबल वाढले आहे.  दररोज दहा ते पंधरा बॉक्स अवैध मार्गाने विक्री होत असल्याचे यामधून दररोज हजारो रुपयांची कमाई केली जात आहे. अवैध धंद्यामुळे गावात तंटे वाढले असून महिलांना याचा नाहक त्रास होत आहे. यामुळे संतप्त नागरिकांनी पोलीसांच्या कर्तव्यावर नाराजी व्यक्त करीत स्वत च गावात पुरवठा होणारी दारू पकडून जाळून टाकली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR