24.4 C
Latur
Sunday, July 20, 2025
Homeराष्ट्रीयसंसद अधिवेशनाबाबत बैठकीत ठरली रणनिती

संसद अधिवेशनाबाबत बैठकीत ठरली रणनिती

इंडिया आघाडीची बैठक, २४ पक्षांचे प्रतिनिधी हजर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
इंडिया आघाडीची आज महत्त्वाची बैठक पार पडली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीला २४ पक्षांची उपस्थिती होती. या बैठकीला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हेदेखील उपस्थित होते. या बैठकीत पावसाळी अधिवेशनासंदर्भात चर्चा झाली. पावसाळी अधिवेशनात कोणत्या मुद्यांवर सरकारला जाब विचारायचा यावर रणनीती आखण्यात आली आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात प्रमुख ८ मुद्दे उपस्थित करण्यावर मतैक्य झाले. यामध्ये पहलगाम दहशतवादी हल्ला, दहशतवादी अद्याप का पकडले गेले नाहीत, ऑपरेशन सिंदूर, युद्धबंदी आणि ट्रम्प यांचा दावा, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी २४ वेळा असा दावा केला की व्यापार कराराच्या बदल्यात युद्धबंदी करण्यात आली होती, या मुद्यांवर पंतप्रधान गप्प आहेत. पंतप्रधानांनी यावरील चर्चेदरम्यान उपस्थित राहावे आणि उत्तर द्यावे, अशी मागणी करण्याचे ठरले. यासोबतच एसआयआर मतदानावर बंदी आणि मतदानाचा अधिकार धोक्यात आहे. चीन, गाझा बद्दल भूमिका, दलित, अल्पसंख्याक, महिलांवरील अत्याचार, सीमांकन आणि अहमदाबाद विमान अपघात या मुद्यावरून सरकारला घेरण्याचे ठरले.

मोदींच्या उपस्थितीबाबत
विरोधक राहणार आग्रही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर संदर्भात होणा-या चर्चेदरम्यान सभागृहात उपस्थित राहावे यावर विरोधक आग्रही आहेत. मोदींनी ऑपरेशन सिंदूरबाबत सभागृहाला माहिती द्यावी, अशी विरोधकांची मागणी आहे, या बैठकीत या मुद्यावर जोर देण्यात आला. पहलगाम हल्ला झाला, त्यातील दहशतवादी अजूनही का पकडले गेले नाहीत, यावरून विरोधक या पावसाळी अधिवेशनामध्ये मोदी सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत.

लवकरच दुसरी बैठक
दरम्यान इंडिया आघाडीची पुढची बैठक लवकरच होणार आहे, काही दिवसांपूर्वीच महाविकास आघाडीपूर्वी इंडिया आघाडीची बैठक व्हावी, अशी इच्छा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली होती, त्यानंतर आज इंडिया आघाडीची बैठक पार पडली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR