साहेब निर्णय घ्या…! येवल्यात झळकले पोस्टर्स; समर्थकांची नाराजी

नाशिक : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेचा खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी मंत्री छगन भुजबळ इच्छुक होते. भुजबळ यांचे नाव आघाडीवर असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राजेंद्र जैन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे दिल्लीत जाण्याचे भुजबळ यांचे स्वप्न भंगल्याने आता नाशिक जिल्ह्यातील भुजबळ समर्थकही निराश झाले आहेत.
मंत्री भुजबळांचा मतदारसंघ असणा-या येवला शहर व तालुक्यात सोमवारी (दि. ८) ‘साहेब निर्णय घ्या…’ अशा आशयाचे पोस्टर झळकल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. येवला शहरातील विविध चौक, प्रमुख रस्ते व सार्वजनिक ठिकाणी हे पोस्टर लावण्यात आले आहेत.

छगन भुजबळांनी मी देखील पक्षाच्या उभारणीसाठी सुरुवातीपासून काम केले आहे. त्यामुळे मलाही इतर नेत्यांप्रमाणे न्याय हवा, अशी मागणी करत आपली नाराजी व्यक्त केली होती. आता त्यांचे समर्थकही नाराज झालेले दिसत आहेत. त्यांच्या समर्थकांनी पोस्टरद्वारे भुजबळ यांच्यावरील निष्ठा व्यक्त करत त्यांना पुढील राजकीय भूमिकेबाबत निर्णय घेण्याचे आवाहन केल्याचे दिसून येत आहे.

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भुजबळ समर्थकांना त्यांच्या उमेदवारीची अपेक्षा होती. येवल्यात जवळपास वर्षभरापासून पोटनिवडणुकीचे वारे वाहत होते. त्यादृष्टीने समीर भुजबळ हे मतदारसंघात जनसंपर्क वाढवत होते.

आपण केंद्रात गेल्यानंतर समीर यांचे राजकीय पुनर्वसन व्हावे अशी भुजबळांची इच्छा होती. त्यामुळेच राज्य मंत्रिमंडळात समीर भुजबळ यांचा समावेश करावा अशी अट भुजबळांनी घातली होती. मात्र, ती मान्य झाली नाही. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर येवल्यात झळकलेल्या या पोस्टरबाजीची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

या पोस्टरमागे नेमके कोण आहे, ते कुणी लावले याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी येवला तालुक्यातील राजकारणात त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. भुजबळ आगामी काळात यावर कोणती भूमिका घेतात. तसेच कार्यकर्त्यांच्या भावनांना कसा प्रतिसाद देतात, याकडे आता राजकीय वर्तुळात सर्वांचे लक्ष लागले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|अण्णा हजारेंचा 90 वा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार
02:13
Video thumbnail
Latur|लातूरच्या नाट्यगृहाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर;अर्धवट नाट्यगृहाचे काम महिन्यांपासून ठप्प
04:14
Video thumbnail
शेकडो शेतकरी रस्त्यावर;महावितरणच्या अभियंत्यांनी लेखी आश्वासन दिल्याने कासेगावचे आंदोलन तूर्तास मागे
00:37
Video thumbnail
Latur|MIDC मधील आग विझविण्यासाठी युद्धपातळीवरील प्रयत्न
04:07
Video thumbnail
Latur|साडेचार कोटींचे बसस्थानक तयार;तरी प्रवाशांना गळक्या शेडमध्येच थांबावे लागते!
01:22
Video thumbnail
Latur|वीज कोसळून बैल दगावला; शेतकरी दांपत्य स्वतःच ओढते नांगर#marathilivenews #maharashtranews
01:40
Video thumbnail
Latur|15 तास उलटले तरी आग विझेना; लातूर एमआयडीसीत अग्निशमन दलाची झुंज सुरू!
03:18
Video thumbnail
Nanded|नांदेड शहरातील प्री अक्षरा शाळेच्या गोडाऊनला आग;सुदैवाने जीवितहानी टळली
00:54
Video thumbnail
Latur Accident|दुचाकी स्लीप झाल्याने तरुणाचा जागीच मृत्यू; घटनेचा थरारक सीसीटीव्ही समोर
00:42
Video thumbnail
Latur Breaking|MIDC मधील नामांकित कारखान्याला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान
02:07
Video thumbnail
Latur|लातूर एमआयडीसी मध्ये नामांकित कंपनीला भीषण आग; आगीत लाखोच साहित्य जळून खाक
00:15
Video thumbnail
बारामतीत सुनेत्रा पवारांचा 'राऊंड'; रुग्णालयातील अनागोंदी कारभारावरून कर्मचाऱ्यांची काढली खरडपट्टी!
00:57
Video thumbnail
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा हाहाकार! जोरदार धक्क्यांनी इमारती हादरल्या; पाहा अंगावर काटा आणणारा VIDEO
01:12
Video thumbnail
सासू झाली नवरी अन् जावई झाला नवरा! उत्तर प्रदेशातील 'या' अनोख्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल
00:56
Video thumbnail
दिल्लीत जोरदार पाऊस आणि वादळ; ग्राउंड सपोर्ट उपकरणे आदळल्याने एअर इंडियाची ३ विमाने नुकसानग्रस्त
00:26

Latest news