16.2 C
Latur
Tuesday, December 2, 2025
Homeलातूरसिने अभिनेते देशमुख यांना महाराष्ट्ररत्न पुरस्कार प्रदान

सिने अभिनेते देशमुख यांना महाराष्ट्ररत्न पुरस्कार प्रदान

जळकोट : प्रतिनिधी
युवा महाराष्ट्र फाउंडेशन समिती पुणे यांच्या वतीने  दि. १६ एप्रील २०२४ रोजी पंडीत जवाहरलाल नेहरु कला दालन ढोले रोड येथे विविध क्षेत्रात कार्य करणा-या कर्तृत्ववान व्यक्तींचा महाराष्ट्ररत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यात लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील उमरगा रेतू या छोट्याशा गावातील  सिने अभिनेते अहेमद देशमुख यांचा समावेश आहे.
त्यांनी सिने सिनेसृष्टीत कमी कालावधीत उत्कृष्ट कार्याबद्दल नावलोकिक मिळविल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे. अभिनेत्री झेबा शेख, अभिनेत्री मोनालीसा बागल, सिने अभिनेते वैभव चव्हाण, रुही तारु यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी आयोजक गणेश विटकर, डॉ. अविनाश सकुंडे, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संजीव टांकसाळे, कार्तीक पालीवाल, सचिन जाधव, सोनू उर्फ मारुती चव्हाण, डॉ. नितीन बोरा, श्रध्दा राहूल जवंजाळ हे उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR