धाराशिव : प्रतिनिधी
जुने सोने द्या व नवीन सोन्याचे बिस्कीट घ्या, असे म्हणून दोघांनी महिलांना भूरळ घातली. तसेच त्यांच्याकडील तब्बल २ लाख रूपयांचे सोन्याचे दागिने घेवून पोबारा केला. सदर घटना उमरगा शहरात घडली. विठ्ठल ग्यानबा जाधव (वय २८, रा. सलगरा बु. ता. लातूर) व एक अनोळखी व्यक्ती यांनी ३० जून रोजी उमरगा शहरातील पंतगे रोडवरील झेरॉक्स सेंटरजवळ अनिता शिवाजी आसुरे (वय ४५, रा. त्रिकोळी ता. उमरगा) यांना नमूद व्यक्तींनी आमच्या जवळ सोन्याचे बिस्कीट आहेत जुने सोने देवून घेतले आहेत.
तुम्ही पण तुमच्या जवळील कानातील व गळ्यातील दागिने देवून नवीन बिस्कीटचे सोने घ्या, असे म्हणून फिर्यादी व इतर महिलांना भुरळ घालुन त्यांच्या जवळील ४७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अंदाजे १ लाख ९० हजार रूपये किंमतीचे दागिने घेवून फसवणूक करुन चोरुन नेले. याप्रकरणी अनिता आसुरे यांनी २७ जुलै रोजी दिलेल्या फिर्यादीवरून उमरगा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ४१७, ४२०, ३४ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.