लातूर : प्रतिनिधी
तालुक्यातील सांगावी – सुनेगाव जवळील मन्याड नदीवरील नॅशनल हायवे वरच्या पुलावरुन अवैध वाळूने भरलेला हायवा टिप्पर दि. २९ डिसेंबर रोजी मध्यरात्री नदीत कोसळून अपघात झाला असुन चालकाचा जागीच मृत्यु झाला आहे तर बाजुस बसलेला एक जण गंभीर जखमी झाला आहे हमदपूर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून अनेकांच्या आशिर्वादाने अवैद्य मार्गाने गंगाखेड येथील गोदावरी नदीपात्रातुन उपसा केलेली वाळू लातुर- नांदेडच्या सिमावर्ती भागातील राळगा गावाजवळील एका शेतक-याच्या शेतात मोठ्या प्रमाणात साठा करून तो रात्रीच्या वेळी टिप्परच्या साह्याने अहमदपूर शहरात विक्री केला जात आहे. एवढेच नाही तर गंधार तालुक्यातील टिप्पर चक्क अहमदपूर तालुक्यातील अनेक खेड्यापाड्याच्या भागात चोरट्या मार्गाने आणून भावाच्या संवादाराने वाळू विक्री करीत आहेत.
नॅशनल हायवेवरील सांगवी सुनेगाव मन्याड नदीच्या पुलावर पुलाची मजबुती पाहण्याकरीता के.टी.आय.एल या रस्ता व पुल करणा-या कंपनीचे चार दहा टायरी हायवा टिप्पर अवजड वस्तु भरून गेल्या दोन दिवसापासुन उभे करण्यात आले होते.तसेच सदरील रस्त्याच्या दोन्ही बाजु एक किलोमिटर अंतरावरून बंद करण्यात येऊन एकाच बाजुने वाहतुक वळविण्यात आली होती. एक अवैद्य वाळूने भरलेला दहा टायर असलेला टाटा कंपनीचा २५१८ मॉडेलचा हायवा टिप्पर क्रमांक एम एच २६ बिई ८०८० हा नांदेड-लातुर सिमावर्ती भागातुन अहमदपूरकडे नॅशनल हायवे वरून येत होता परंतु ड्रायव्हरने वळण रस्ता न वापरता बंद केलेल्या रस्त्यावर हायवा घेऊन आला सांगवी सुनेगावच्या पुलाजवळ तो आला असता अचानक समोर थांबलेले चार हायवा दिसल्यामुळे ड्रायव्हरचा हायवा टिप्परचा ताबा सुटुन तो दि. २९ डिसें रोजी मध्यरात्री अंदाजे २ वाजता पुलावरून नदीत कोसळला असुन ड्रायव्हर हानमंत रावसाहेब ढवळे वय ३५ वर्ष रा दगडगाव ता लोहा जि नांदेड याचा जागीच मृत्यु झाला असुन आनंद सुभाष गोडबोले रा जवळा ता लोहा येथील युवक गंभीर जखमी झाला आहे. त्याला नांदेड येथे दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. सदरील अपघाताच्या घटनेची अहमदपूर पोलीस स्टेशन येथे नोंद करण्यात आली असल्याचे सांगितले.