लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत तिकिट कुणालाही मिळो, ही लढाई तिकिटाची नसून महापुरुषांचे विचार जिवंत ठेवण्याची आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी केले.
लातूर शहरातील प्रभाग १३ मधील प्रकाशनगर येथील श्री दत्त मंदिराच्या सभागृहात प्रा. शिवाजीराव जवळगेकर व मित्र परिवाराच्या वतीने ९ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी काँग्रेसचे लातूर जिल्हाध्यक्ष अभय साळुंके, शहर जिल्हाध्यक्ष अॅड. किरण जाधव, मनपा प्रभाग संपर्क प्रमुख सूर्यकांत कातळे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. दिनेश नवगिरे यांच्या सत्कार सोहळ्यात अभय साळुंके बोलत होते.
यावेळी माजी स्थायी समिती सभापती बाळासाहेब देशमुख, माजी नगरसेविका श्रीमती कमलताई सोमवंशी, स्वाती जवळगेकर, अॅड. विजय गायकवाड, किरण जाधव, माजी नगरसेवक धोंडीराम यादव, युवक काँग्रेचे नेते सतीश साळुंके, मुन्ना शिंदे, नालंदा ट्रस्टचे उत्तमराव कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी प्रास्ताविक प्रा. डॉ. शिवाजीराव जवळगेकर यांनी केले. या सत्कार कार्यक्रमाला प्रभाग १३ मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण कांबळे यांनी केले तर अशोक देडे यांनी आभार मानले.

