17.3 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeलातूर१५ ऑगस्ट रोजी लातुरात स्वर विलास संगीत दरबार

१५ ऑगस्ट रोजी लातुरात स्वर विलास संगीत दरबार

लातूर : प्रतिनिधी
लोकनेते  विलासरावजी देशमुख यांच्या  स्मृति प्रित्यर्थ  १५ ऑगस्ट रोजी स्वर विलास संगीत दरबारचे आयोजन करण्यात आले असुन लातूरची सांस्कृतिक चळवळ ख-या अर्थाने ज्यांच्या राजाश्रयामुळे साता समुद्रापार पोहोचली ते लोकनेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना ही संगीत सभा समर्पित होत आहे, अशी माहिती या स्वर संगीत दरबारचे स्वागताध्यक्ष माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी दिली आहे.
अभिजात शास्त्रीय संगीताच्या प्रचार व प्रसारासाठी मागील ११३ महिन्यांपासून आवर्तन प्रतिष्ठान अविरतपणे केवळ शास्त्रीय संगीताच्या मैफिली लातूरमध्ये घडवून आणत आहे. या संगीत सभेमध्ये आजपर्यंत भारतातले अनेक दिग्गज कलावंतांनी हजेरी लावलेली आहे. याच आवर्तन मासिक संगीत सभेचा  शतकपूर्ती संगीत समारोह न भूतो न भविष्यती झाला आणि या शतकपूर्ती संगीत समारोहाचे स्वागताध्यक्ष माजी मंत्री सहकार महर्षी व एक जाणकार रसिकाग्रणी माननीय दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.  या संगीत समारोहाला रसिकांनी भरगच्च दिलेली दाद आणि कलावंतांनीही लातूरच्या रसिक देवतेचे केलेले भरभरून  कौतुक खरोखरच आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या सांस्कृतिक स्वप्नपूर्तीचाच एक परिपाक होता.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आवर्तन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभय शहा सचिव डॉ. रविराज पोरे, कार्यक्रम नियोजन प्रमुख विशाल जाधव मार्गदर्शक श्री.अतुल देऊळगावकर, डॉ. अजित जगताप, डॉ. संदीपान जगदाळे प्रा. हरिसर्वोत्तम जोशी, किरण भावठाणकर, विवेक डोंगरे, सुनील टाक , महेश काकनाळे, केशव जोशी , हरीराम कुलकर्णी,व्यंकटेश पांचाळ, दिनकर पाटील, काकासाहेब सोनटक्के,डॉ.भदाडे, शशिकांत देशमुख, डॉ. वृषाली देशमुख, डॉ. मंजुषा कुलकर्णी, हे परिश्रम घेत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR