नवी दिल्ली : कॅन्सर अथवा कर्करोग हा सर्वसामान्यपणे वाईट जीवनशैली, तंबाखू, दारू अथवा अनुवंशिकतेमुळे होतो, असा अनेकांचा समज आहे. मात्र, द लॅन्सेट ऑन्कोलॉजी या वैद्यकीय नियतकालिकाने नुकताच एक जागतिक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालाने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे. भारतात जीवाणू अर्थात बॅक्टेरिया आणि विषाणू अर्थात व्हायरसच्या संसर्गामुळे दरवर्षी सुमारे १.९ लाख कर्करोगाचे नवे रुग्ण समोर येत आहेत असे या अहवालात म्हणण्यात आले आहे.
दिवसागणिक कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. महाराष्ट्रातही कॅन्सरचे वाढते प्रमाण चिंतेचा विषय बनले आहे. केंद्र सरकारने आयसीएमआख्या हवाल्याने दिलेल्या आकडेवारीनुसार, २०२५ मध्ये महाराष्ट्रात १ लाख ३० हजार ४६५ नवीन कर्करोग रुग्ण होते. हा आयसीएमआर एनसीडीआयआरचा अंदाज असून, २०२४ मध्ये १ लाख २७ हजार ५१२ कॅन्सर रुग्णांचा अंदाज होता. त्यामुळे वर्षभरात नवीन रुग्णसंख्येत २,९५३ ने वाढ झाली आहे. देशातील राज्यनिहाय आकडेवारीत महाराष्ट्राचा क्रमांक उत्तर प्रदेशनंतर दूसरा आहे. कर्करोगाचे प्रमाण भारतामध्ये गेल्या तीन दशकांत (१२२० ते २०२३) २६.४ टक्क्यांनी वाढले आहे. अहवालानुसार, देशपातळीवरही २०२४ मधील १५ लाख ३३ हजार ५५५ वरून २०२५ मध्ये १५ लाख ६९ हजार ७९३ नवीन कर्करोग रुग्ण वाढल्याचा सरकारी अंदाज आहे.
संसर्गाचा वाटा १२ टक्के
जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर’च्या संशोधकांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, भारतात २०२४ मध्ये १५.६२ लाखांहून अधिक कॅन्सर रुग्णांची नोंद झाली. यांपैकी तब्बल १२ टक्क्यांहून अधिक रुग्ण केवळ जुन्या संसर्गामुळे समोर आले आहेत.
सर्वात मोठा शत्रू ुमन पॅपिलोमा व्हायरस
भारतात संसर्गामुळे होणा-या कर्करोगात ‘ ुमन पॅपिलोमा व्हायरस’ अर्थात ऌढश् हे एक सर्वात मोठे कारण आहे. केवळ या एकाच व्हायरसमुळे तब्बल १ लाखांहून अधिक कॅन्सर बाधित झाले आहेत. महत्वाचे म्हणजे, महिलांमधील गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगासाठीही हा एक मुख्य कारण ठरतो. मात्र, वेळेवर लसीकरणाच्या माध्यमाने यापासून पूर्णपणे बचावही शक्य आहे.
पोट आणि यकृताला निशाणा बनवणारे जंतू
हेलिकोबॅक्टर पायलोरी, पोटातील या बॅक्टेरियामुळे सुमारे ४७,००० रुग्णांना पोटाचा कर्करोग झाला आहे. हेपॅटायटिस बी आणि सी’मुळे अनुक्रमे १०००० आणि ५३०० कर्करोग रुग्णांची नोंद झाली आहे. तर एपस्टाईन-बार व्हायरस हा सुमारे २२००० कर्करोग रुग्णांसाठी जबाबदार आढळला आहे.
लसीकरण आणि वेळेवर तपासणी महत्वाची
हा धोका वेळेत टाळता येऊ शकतो, असेही तज्ज्ञांनी म्हटले आहे. लहान वयात मुलींना एचपीव्ही लस देणे, नवजात बालकांना हेपॅटायटिस बी चे लसीकरण करणे आणि पोटाच्या जुन्या समस्यांवर तात्काळ वैद्यकीय उपचार घेणे, हाच यावर सर्वोत्तम उपाय आहे असे मत आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
















