29.3 C
Latur
Sunday, April 21, 2024
Homeराष्ट्रीयभारतातील १ टक्के नागरिकांकडे ४० टक्के संपत्ती

भारतातील १ टक्के नागरिकांकडे ४० टक्के संपत्ती

नवी दिल्ली : भारतीय लोकांची संपत्ती दिवसेंदिवस वाढत असली तरी मोठ्या प्रमाणात असमानता देखील वाढत आहे. श्रीमंत अधिकच श्रीमंत होत आहे तर गरिब अधिकच गरिब होत असल्याचे चित्र सध्या देशात दिसत आहे. देशातील आर्थिक असमानतेबाबतचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये याबाबतची माहिती देण्यात आली. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार देशातील फक्त १ टक्के लोकसंख्येकडे ४० टक्के संपत्ती आहे. म्हणजे उपरलेल्या ९९ टक्के लोकसंख्येकडे ६० टक्केच संपत्ती आहे.

सन २००० पासून देशातील श्रीमंत व्यक्तिंच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. भारतात आर्थिक विषमता वाढत असल्याचे दिसून येत असून देशातील १ टक्के लोकसंख्येकडे ४० टक्के संपत्ती असल्याचे अहवालातून समोर आले आहे. अहवालात दिलेल्या माहितीनुसार २००० पासून देशातील श्रीमंत व्यक्तिंच्या संपत्तीत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक विषमता वाढली. २०२२-२३ मध्ये देशातील १ टक्के लोकसंख्येच्या संपत्तीत २२.६ टक्क्यांची वाढ झाली. दरम्यान, आर्थिक बिषमतेसंदर्भातील अहवाल थॉमस पिकेट्टी (पॅरिस स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स), लुकास चॅन्सेल (हार्वर्ड केनेडी स्कूल) आणि नितीन कुमार भारती (न्यूयॉर्क विद्यापीठ) यांनी तयार केला आहे.

पैसा विशिष्ट लोकांकडेच
देशातील पैसा विशिष्ट लोकांकडेच जात आहे. त्यामुळे दिवसेंदिवस देशातील आर्थिक विषमता वाढत आहे. २०१४-१५ ते २०२२-२३ या काळात देशातील अब्जाधिशांच्या संपत्तीत लक्षणीय वाढ झाली. त्याचा परिणाम म्हणून देशात गरिब श्रीमंत यांच्यातील दरी वाढली आहे. देशातील फक्त १ टक्के लोकसंख्येकडे सर्वांत जास्त हिस्सेदारी आहे. दरम्यान, भारतातील आर्थिक असमानतेवरील अहवालात म्हटले आहे की, देशातील अतिश्रीमंत लोकांवर सुमारे २ टक्के अतिरिक्त कर लादला जावा. तसेच आरोग्य, शिक्षण आणि पोषण यावर गुंतवणूक वाढवली पाहिजे अशी माहिती या अहवालात देण्यात आली आहे.

श्रीमंतांच्या संपत्तीत २२ टक्क्यांनी वाढ
आर्थिक विषमता अहवालात दिलेल्या माहितीनुसार २००० सालापासून श्रीमंताच्या संपत्तीत वेगाने वाढ होत गेली. तिथूमच गरिब आणि श्रीमंत यांच्यातील दरी वाढ गेल्याचे म्हटले आहे. १९२२ मध्ये देशातील १ टक्के श्रीमंत लोकसंख्येकडे १३ टक्के संपत्ती होती. मात्र, त्यानंतरच्या काळात २०२२-२३ मध्ये देशातील १ टक्के लोकसंख्येच्या संपत्तीत २२.६ टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती या अहवालात सांगण्यात आली आहे. या १ टक्के श्रीमंत लोकसंख्येकडे देशातील ४० टक्के संपत्ती एकवटली आहे. यावरुन आर्थिक विषमता किती आहे हे दिसून येते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR