20 C
Latur
Tuesday, November 5, 2024
Homeमहाराष्ट्रखव्याच्या दरात १०० रुपयांनी वाढ

खव्याच्या दरात १०० रुपयांनी वाढ

पुणे : प्रतिनिधी
सध्या संपूर्ण राज्यात नवरात्र उत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. सणासुदीच्या काळामध्ये खाद्यपदार्थांबरोबरच विविध वस्तूंच्या मागणीत वाढ होत असते. त्यामुळे दरामध्येही वाढ पाहायला मिळते.
सणासुदींच्या काळात मिठाई तयार करण्यासाठी खव्याला मोठी मागणी असल्याने खव्याचे दरही तेजीत असल्याचे पाहायला मिळत आहे. याचाच अनुभव खवा बाजारात पाहायला मिळत आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत खव्याच्या दरात १०० रुपयांनी वाढ झाली आहे.

नवरात्र उत्सव सुरू झाल्याने खव्याच्या दरामध्ये १०० रुपयांची वाढ झाल्याचे पाहायला मिळते आहे. मागील आठवड्यात २०० ते २२० रुपये प्रति किलो असलेला खव्याचा दर आता २८० ते ३०० रुपये प्रति किलो झाला आहे.

नवरात्रोत्सवात खव्याला चांगली मागणी असल्याने खव्याच्या दरात वाढ झाली आहे. यामुळे शेतकरी समाधानी आहेत. दरम्यान, दिवाळीमध्ये खव्याचे दर ४००-५०० रुपये प्रति किलोपर्यंत जाऊ शकतात, असा अंदाज व्यापा-यांनी व्यक्त केला आहे.

तर खव्याला चांगला दर मिळत असल्याने शेतक-यांना वैरण, पेंड इत्यादी जनावरांना देण्यासाठी पैसे उरत आहेत. तसेच आणखी काही दिवसांनी दिवाळी सण येत आहे. तेव्हा खव्याचे दर ४०० ते ५०० रुपये प्रति किलोपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR