नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आजच्या बजेटमधून महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. निर्मला सीतारामन यांनी आपला आठवा बजेट मांडताना शेतकरी, महिला आणि शिक्षणावर अधिक भर दिलेला आहे. विमा क्षेत्रात १०० टक्के विदेशी गुंतवणूक करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आजच्या अर्थसंकल्पीय भाषणात विमा क्षेत्रात १०० टक्के परदेशी गुंतवणुकीस मंजुरी देण्याची घोषणा केली. याआधी विमा क्षेत्रात ७४ टक्के परदेशी गुंतवणुकीची मर्यादा होती. आता विमा क्षेत्र हे संपूर्णपणे परदेशी गुंतवणूकदारांसाठी खुलं करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशांतर्गत विमा क्षेत्रात मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे.