६ वर्षांत १३.४ कोटी रोजगार वाढले

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी यांनी जागतिक बँकेच्या एका अहवालाचा उल्लेख करताना सांगितले की, २०११ ते २०२३ दरम्यान भारतातील ४९.६ कोटी लोक गरिबीतून बाहेर आले. या काळात गरिबीच्या दरात ९०% घट झाली.

पंतप्रधानांनी सांगितले की, गेल्या ६ वर्षांत रोजगाराच्या १३.४ कोटी नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. ही संख्या कामकाजाच्या वयातील लोकसंख्येत झालेल्या वाढीपेक्षा जवळपास दुप्पट आहे. यासोबतच देशातील आर्थिक असमानताही कमी झाली आहे. त्यांनी ही माहिती इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून दिली. वास्तविक, जागतिक बँकेने ऑक्टोबरमध्ये इंडिया पॉव्हर्टी अँड इक्विटी ब्रीफ या नावाने अहवाल जारी केला. त्यानुसार, भारतातील अत्यंत गरिबीचा दर २०११ मध्ये २७.१% होता, जो २०२३ मध्ये घटून २.६% राहिला. मोदी म्हणाले की, वर्ल्ड बँकेच्या मते भारतात जगातील सर्वात वेगाने गरिबी कमी झाली आहे. त्यांनी सांगितले की, गरिबी निर्मूलन हे सरकारसाठी केवळ एक घोषवाक्य नसून, दृढ संकल्प आहे. आर्थिक असमानता मोजणा-या गिनी निर्देशांकात २०% पेक्षा जास्त घट झाली आहे.

हा निर्देशांक कमी होऊन २३.० वर पोहोचला आहे. अहवालानुसार, दररोज सुमारे ४०० डॉलर्स पेक्षा कमी कमाई करणा-या लोकांची संख्या ५७.७% वरून कमी होऊन आता केवळ १६.१% राहिली आहे. अंदाज आहे की, २०२८ पर्यंत हा आकडा कमी होऊन १२.१% वर येईल. केवळ उत्पन्न किंवा पैशांच्या बाबतीतच नव्हे, तर नॉन-मॉनिटरी दारिद्रय म्हणजेच सामान्य लोकांच्या राहणीमानात आणि सुविधांच्या पातळीतही मोठी सुधारणा झाली आहे. आता लोकांकडे पक्की घरे, वीज, स्वच्छ पाणी, शौचालये आणि स्वयंपाकाचा गॅस यांसारख्या मूलभूत सुविधा पूर्वीपेक्षा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. ऑक्सफर्डच्या अहवालानुसार, २००५-०६ मध्ये देशातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या म्हणजेच ५३.८% लोक या मूलभूत सुविधांपासून वंचित होते. २०१९-२१ पर्यंत ही संख्या घटून केवळ १६.४% राहिली आहे.

गरिबी कमी होण्याची ३ कारणे
१) सामान्य लोकांचे उत्पन्न आणि खर्च वाढला
लोकांची खरेदी करण्याची आणि खर्च करण्याची क्षमता सुधारली आहे.

२) गावांतील महिलांना रोजगार मिळाला
२०१७ ते २०२३ दरम्यान सुमारे १३.४ कोटी नवीन रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या. याचा सर्वाधिक फायदा ग्रामीण महिलांना झाला, ज्या प्रथमच उत्पन्न मिळवून देणा-या कामांशी जोडल्या गेल्या.

३) सरकारी योजनांची मदत
सरकारकडून मिळणारे मोफत धान्य आणि थेट बँक खात्यात पैसे जमा करण्यासारख्या योजनांनी गरीब कुटुंबांना मोठा आधार दिला.

जागतिक बँकेची आकडेवारी
जागतिक बँकेच्या स्वत:च्या निकषांनुसारही २०२२-२३ मध्ये अशी गरीबी घटून केवळ १५.५% राहिली आहे.

आव्हाने
उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये ५७% गरीब लोकसंख्या जागतिक बँकेनुसार, गरिबी कमी झाली असली तरी देशासमोर काही मोठी आव्हाने अजूनही कायम आहेत. देशातील एकूण गरीबांपैकी सुमारे ५७% लोक उत्तर प्रदेश ते पश्चिम बंगालदरम्यानच्या भागांत राहतात. या राज्यांमध्ये नवीन आणि चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे आहे.

तरुणांमधील बेरोजगारी
तरुणांमधील बेरोजगारीचा दर १४.६% वरून १५.९% झाला आहे. यामध्ये ग्रामीण भागातील तरुण महिलांची संख्या अधिक आहे.

उत्पन्न वाढत नाही
येथील लोकांना काम मिळाले, पण त्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली नाही, कारण बहुतांश नोक-या कमी उत्पन्नाच्या क्षेत्रांतच मिळाल्या आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

सुर्यकांत सरन्यायाधीशांच्या खुर्चीवर बसण्याच्या लायक नाहीत

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सरन्यायाधीश सूर्यकांत आणि...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur News | ऐन दुष्काळात लाखो लिटर पाणी गटारात; स्वातंत्र्य सैनिक नगरमध्ये जलवाहिनी फुटली
01:53
Video thumbnail
LIVE - आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते किसना डायमंड आणि गोल्ड ज्वेलरी शॉपच उद्घाटन
00:00
Video thumbnail
Dharmabad News | सर्पदंशाच्या रुग्णाची रुग्णवाहिका रस्त्यात बंद
01:17
Video thumbnail
Latur Bank Election| बाभळगावात शिट्टी वाजवून सहकार पॅनलचा जल्लोष; १९ पैकी १४ जागांवर विजय
00:47
Video thumbnail
Diliprao Deshmukh Reaction | धीरज देशमुख कॅप्टन, विजयाचे श्रेय त्यांना – दिलीपराव देशमुख
04:23
Video thumbnail
Jalkot Accident News | जळकोटमध्ये अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू, एक जखमी
01:22
Video thumbnail
Nanded News | आदिवासी महादेव कोळी समाजाचा मोर्चा; घटनात्मक हक्कांसह श्वेतपत्रिकेची मागणी
00:38
Video thumbnail
Nanded News | ऊस उत्पादकांच्या मागण्यांचे निवेदन दिले; बालाजी गाडे यांना ५ कोटींची नोटीस
02:16
Video thumbnail
Journalist First Reaction | पत्रकारांच्या नजरेतून लातूर जिल्हा बँकेचा निकाल
11:49
Video thumbnail
Dhiraj Deshmukh First Reaction| लातूर जिल्हा बँक निवडणुकीत ११ जागांवर विजय; धीरज देशमुख काय म्हणाले?
02:42
Video thumbnail
Election Update|लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक निकाल
04:13
Video thumbnail
Rushikesh Karad|"नीट बोला" आमदार पुत्राला पोलिसांनी झापलं!
00:22
Video thumbnail
Rushikesh Karad|"नीट बोला"आमदार पुत्राला पोलिसांनी झापलं!
01:07
Video thumbnail
Nanded News | पाकिस्तानी क्रीममध्ये 48 हजार पट पारा! फॉरेन्सिक अहवालात धक्कादायक निष्कर्ष
03:02
Video thumbnail
Nanded|शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन
05:43

Latest news