जम्मू-काश्मिरातील १३% लोकसंख्या ड्रग्सच्या आहारी

श्रीनगर : पंजाबनंतर जम्मू-काश्मीर अंमली पदार्थांचे नवीन केंद्र म्हणून समोर आले आहे. सरकारी अंदाजानुसार, राज्याच्या १.३ कोटी लोकसंख्येपैकी सुमारे १३.५ लाख लोक (१३% पेक्षा जास्त) अंमली पदार्थांच्या आहारी गेले आहेत. २०२२ मध्ये हा आकडा सुमारे ६ लाख होता.

अधिका-यांचे म्हणणे आहे की, दहशतवादासोबतच आता अंमली पदार्थांचे जाळे देखील मोठे आव्हान बनून उभे राहिले आहे. डीजीपी नलिन प्रभात यांनीही पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आणि अंमली पदार्थांच्या जाळ्याला मोठा धोका म्हटले आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने १०० दिवसांची नशा-विरोधी मोहीम सुरू केली आहे. यात आतापर्यंत १ कोटींहून अधिक लोक सहभागी झाले आहेत.

दक्षिण काश्मीरमधील मोहम्मद अमीन सांगतात की, त्यांचा मुलगा वकील बनू इच्छित होता, पण शाळेत सिगारेटपासून सुरू झालेले व्यसन हळूहळू चरस आणि हेरोईनपर्यंत पोहोचले. नंतर अंमली पदार्थ खरेदी करण्यासाठी त्याने घरातील वस्तू विकायला सुरुवात केली. अंमली पदार्थांच्या व्यसनातून बाहेर पडलेल्या आदिल भट यांचे म्हणणे आहे की, यामागे संघटित टोळ्या काम करत आहेत, ज्यांचे संबंध पंजाबमधील डीलर्सशी जोडलेले आहेत. अंमली पदार्थ सीमावर्ती भागातून जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचत आहेत.

१६५ हॉटस्पॉट चिन्हित, ७०४ एफआयआर
जागरूकता मोहिमेसोबत कायदा अंमलबजावणी करणा-या यंत्रणांनी ड्रग्ज नेटवर्कवर कारवाई तीव्र केली आहे. एनडीपीएस कायद्यांतर्गत ७०४ एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. प्रशासनाने १६५ अशा क्षेत्रांची ओळख केली आहे, जिथे अंमली पदार्थांचा व्यवसाय जास्त आहे, जेणेकरून तिथे विशेष पाळत ठेवता येईल.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
लातूर - मिनी मार्केट जवळील पेट्रोल पंपावर स्कूटीने घेतला अचानक पेट #marathilivenews #maharashtranews
00:42
Video thumbnail
Latur|चोला फायनान्सचा मॅनेजर लाखो रुपये घेऊन फरार?
06:08
Video thumbnail
Latur|मोदी सरकारचा मोठा निर्णय? उज्ज्वला महिलांना बसला धक्का!
04:49
Video thumbnail
Nanded|महायुतीत मतभेद नाहीत;हेमंत पाटील यांच्या वक्तव्यावर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया
01:21
Video thumbnail
Latur|रुग्णालयाच्या जागेवर बुलडोजर;अतिक्रमण हटवताना आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवला जीव!
02:49
Video thumbnail
Latur|मुरुड शहर कचराकोंडीत; ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार
02:22
Video thumbnail
Latur|गॅस टंचाईमुळे पुन्हा पेटल्या चुली; लाकडाला आले सोन्याचे दिवस
04:34
Video thumbnail
Nanded Accident|ट्रक-टँकरच्या अपघातात एक जण जागीच ठार
00:32
Video thumbnail
Nanded Murder|सोनखेड पेट्रोल पंपावर प्लंबरचा खून;मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद
00:34
Video thumbnail
Nanded |इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर; फळबागेतून दरवर्षी लाखोंची कमाई
04:26
Video thumbnail
विलासराव देशमुखांच्या आठवणींना उजाळा: विद्यार्थ्यांची कविता #Maharashtra #VilasraoDeshmukh #Marathi
02:48
Video thumbnail
मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या पूर्ततेनिमित्त NDA बैठकीत मोदींनी नेत्यांसोबत घेतला 'झालमुडी'चा आस्वाद
00:37
Video thumbnail
अभिनेत्री सारा अर्जुनने वडिलांसह घेतले बाबा महाकालांचे दर्शन; उज्जैनच्या 'भस्म आरती'त झाली लीन!
00:30
Video thumbnail
क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरल्याने गोदावरीत बोट बुडाली; दोन महिलांना गमवावा लागला जीव.
00:34
Video thumbnail
मांजराचा 'दिलजले' अंदाज! गर्लफ्रेंडला दुसऱ्या बोक्यासोबत पाहून उंदराला दिलं जीवदान, व्हिडिओ व्हायरल!
00:23

Latest news