21.6 C
Latur
Wednesday, January 14, 2026
जळकोट येथे सफाई कामगारांचे वेतन रखडले
जळकोट : प्रतिनिधी
जळकोट शहरातील सफाई व रस्ते झाडू काम करणा-या महिला कामगाराचे १३ महिन्यापासून रखडलेले वेतन तात्काळ मिळण्यात यावे, अन्यथा जळकोट नगरपंचायत कार्यालयासमोर स्वच्छतेच्या साधनासह धरणे आंदोलन करण्याचे निवेदन आज दि. २६ डिसेंबर रोजी जळकोट नगरपंचायत कार्यालयाचे मुख्याधिकारी, तहसीलदार यांना देण्यात आले.
जळकोट नगरपंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक १ ते वार्ड क्रमांक-१७  प्रभागांमध्ये सफाईचे व रस्ता झाडू स्वच्छतेचे काम करीत असून, आपल्या नगरपंचायतकडून स्वच्छतेच्या कामासाठी घेतलेल्या एजन्सी धारकाने १३ महिन्यापासून आमची मासिक वेतन अदा केलेली नाही. सदरील एजन्सी धारकाने आमचे नाव एजन्सीच्या कर्मचारी निवड रजिस्टर वर अद्याप नोंद घेतलेली नाही. आम्हाला खाजगी रित्या वेतन देऊन आमच्याकडून काम करून घेतले जात आहे. असे न करता संबंधित स्वच्छता एजन्सी धारकांनी आमचे नाव स्वच्छता कर्मचारी व सफाई कर्मचारी म्हणून एजन्सीच्या मुख्य कर्मचारी नोंद रजिस्टरला घेण्यात यावी, आमच्या नावे गट विमा काढण्यात यावा व रखडलेले १३ महिन्याचे वेतन तात्काळ देण्यात यावे. अन्यथा सात दिवसाच्या आत वरील एजन्सी धारकांनी आमचे रखडलेले १३ महिन्याचे वेतन व स्वच्छता कर्मचा-यांच्या मुख्य रजिस्टरवर आमच्या नोंदी न केल्यास आम्ही जळकोट शहरातील स्वच्छतेचे काम बंद करून जळकोट नगरपंचायत कार्यालयासमोर स्वच्छतेच्या साधना सह धरणे आंदोलन करून न्याय मागणार आहोत. यांची गांभीर्याने नोंद घ्यावी अशी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी उज्वला अशोक कदम, छाया राजू नामवाड, ललूबाई बापूराव घोडके, अंजनाबाई लक्ष्मण नामवाड, नागीनबाई माधव नामवाड, संगीता शिवाजी वाघमारे, सरस्वती गोविंद भांगे, आम्रपाली संग्राम वाघमारे, जनाबाई उत्तम शिंदे, जयाबाई रोहिदास मोरे, कालिदा विलास कोकणे, छाया अंकुश कोकणे, मिना संग्राम कांबळे, अनुसया रामकिशन तोगरे, सविता संभाजी तोगरे, कल्पना माधव सोनकांबळे, सयाबाई शिवाजी तोगरे, लक्ष्मीबाई बालाजी सोनकांबळे, यमुनाबाई बाबुराव वाघमारे, या सर्व सफाई कामगार महिला मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR