30.4 C
Latur
Friday, February 13, 2026
Homeअंतरराष्ट्रीयमेक्सिकोत सापडले १४०० वर्षे जुने थडगे

मेक्सिकोत सापडले १४०० वर्षे जुने थडगे

घुबडाच्या मुर्तीचे प्रतिक असलेले थडगे ‘झापोटेक’ संस्कृतीतील

मेक्सिको सिटी : मेक्सिकोच्या दक्षिणेकडील भागात पुरातत्वशास्त्रज्ञांना १४०० वर्षे जुनी, कोरीव कामांनी सजलेली झापोटेक संस्कृतीचे एक थडगे सापडले आहे. मेक्सिकोच्या राष्ट्रीय मानववंशशास्त्र आणि इतिहास संस्थेने गेल्या आठवड्यात या संदर्भात एक निवेदन प्रसिद्ध केले. या निवेदनानुसार, ओक्साका राज्यातील सॅन पाब्लो हुइट्झो येथे असलेली ही कबर सुमारे ६०० वर्षांपूर्वी झापोटेक संस्कृतीने बांधली होती असे स्पष्ट होते. या शोधाला गेल्या दशकातील सर्वात महत्त्वपूर्ण पुरातत्वीय शोध म्हटले जात आहे.

या कबरीतील अनेक सुस्थितीत असलेल्या अवशेषांपैकी एक म्हणजे दफन कक्षाच्या प्रवेशद्वारावर असलेली घुबडाची मूर्ती. आयएनएएचनुसार, या घुबडाच्या चोचीच्या आत एका माणसाच्या डोक्याची मूर्ती आहे, जी कदाचित आत दफन केलेल्या व्यक्तीचा चेहरा असू शकतो. आजही मेक्सिकोमध्ये लाखो झापोटेक भाषिक लोक राहतात. झापोटेक लोकांसाठी, घुबड हे रात्र आणि मृत्यू या दोन्हींचे प्रतीक आहे.

त्­यामुळे याठिकाणी शक्ती आणि मृत्यूशी संबंधित चिन्हे दर्शवणारी बहुरंगी भित्तिचित्रे देखील आहेत दफन कक्षाच्या प्रवेशद्वारावर दोन मानवी आकृत्यांची शिल्पे आहेत, ज्यांच्या हातात विविध वस्तू आहेत आणि त्या थडग्याचे संरक्षक असावेत. आणि त्या कक्षामध्येच, गेरू, पांढरा, हिरवा, लाल आणि निळ्या रंगात काढलेले एक विलक्षण असे भित्तिचित्र आहे, ज्यात समारंभांदरम्यान लोकांची मिरवणूक दाखवण्यात आली आहे.

मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शिनबाम यांनी पत्रकार परिषदेत या शोधाचे महत्त्व अधोरेखित केले. त्या म्हणाल्या, हा मेक्सिकोमधील गेल्या दशकातील सर्वात महत्त्वपूर्ण पुरातत्वीय शोध आहे. मेक्सिकोच्या संस्कृती सचिव, क्लॉडिया कुरिएल डी इकाझा यांनीही यावर जोर दिला की, ही कबर झापोटेक संस्कृतीबद्दल आणि तिची सामाजिक रचना, अंत्यसंस्काराचे विधी आणि श्रद्धा प्रणाली, जी वास्तुकला आणि भित्तिचित्रांद्वारे जतन केली गेली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR