36.5 C
Latur
Wednesday, April 30, 2025
Homeलातूरकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवप्पा अंकलकोटे यांचे निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवप्पा अंकलकोटे यांचे निधन

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातील जुन्या पिढीतील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा विविध संस्थांशी संबंधीत असलेले शिवप्पा तमणप्पा अंकलकोटे यांचे दि. १ नोव्हेंबर रोजी निधन झाले. ते ९० वषार््ंचे होते. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी दुपारी ४ वाजता येथील वीरशैव लिंगायत स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पुर्वी त्यांची अंत्ययात्रा मंठळेनगरमधील त्यांच्या निवासस्थानापासून काढण्यात आली होती.

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शिवप्पा अंकलकोटे हे लातूर जिल्हा काँग्रेसचे सलग २५ वर्षे कोषाध्यक्ष होते. ते तत्कालीन लातूर नगरपरिषदेचे माजी आरोग्य सभापती होते. सध्या ते गंजगोलाईतील जय जगदंबा देवस्थानचे कोषाध्यक्ष, महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे संचालक आदी पदांवर कार्यरत होते. सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांनी मोठे योगदान दिलेले आहे. शिस्तप्रिय व्यक्तीमत्व म्हणुन त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात दोन मुलं, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR