Homeनांदेडपोलिस ठाण्यातून पळालेले २ आरोपी पुन्हा जेरबंद

पोलिस ठाण्यातून पळालेले २ आरोपी पुन्हा जेरबंद

नांदेड : प्रतिनिधी
एका गुन्ह्याच्या तपासासाठी आणण्यात आलेल्या ३ पैकी २ आरोपीनीं पळ काढल्याची घटना सोमवारी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात घडली. या दोन्ही आरोपींना पुन्हा जेरबंद करण्यात यश आले आहे.

शिवाजीनगर पोलिसांनी एका गुन्ह्याच्या तपासासाठी ३ आरोपींना हस्तांतरण वारंटवर ताब्यात घेतले होते. रविवारी त्यांची चौकशी सुरू होती मात्र सायंकाळी पोलिसांची नजर चुकवत २ आरोपींनी खिडकीतून उड्या मारून पळ काढला. पोलिसांनी तात्काळ धावपळ करत एकाला विसावा गार्डन परिसरात पकडले. तर ५ मे रोजी दुपारी दुसरा फरार आरोपी सोहेल अब्दुल सत्तार (रा. जवाहरनगर, नांदेड) याला पिरबु-हाण नगर येथून अटक केली. यामुळे शिवाजीनगर ठाण्यातील गुन्हे शोध पथकासह पोलिस कर्मचा-यांचा जीव भांड्यात पडला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR