26.3 C
Latur
Thursday, July 10, 2025
Homeसोलापूरबालिकेवर अत्याचार करणाऱ्या मजुरास २५ वर्षे सक्तमजुरी

बालिकेवर अत्याचार करणाऱ्या मजुरास २५ वर्षे सक्तमजुरी

सोलापूर : बांधकामावर मजूर म्हणून काम करणाऱ्या तरुणानं सात वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधीश कविता शिरभाते यांच्या न्यायालयात झाली. या खटल्यात न्यायालयापुढे सादर झालेल्या साक्षी, वैद्यकीय अहवाल, वकिलांचा युक्तिवाद ग्रा धरून न्यायाधीशांनी सुनील सिद्राम म्हेत्रे (२२, बापूजी नगर, सोलापूर) यास २५ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, या खटल्यातील आरोपी सुनील हा फिर्यादीच्या घराच्या बांधकामाचे ठेकेदाराकडे मजूर म्हणून कामास होता. घटनेच्या दिवशी ४ जानेवारी २०२० रोजी पीडित सात वर्षाच्या बालिकेची आई घरामध्ये झोपलेली होती.

आरोपीने पीडित बालिकेला पिण्यासाठी पाणी मागितले. ती पाणी देण्यासाठी गेली असता आरोपीने तिला ‘तुला मोर दाखवतो’ असे म्हणून आत खोलीत जाऊन तिच्याशी लैंगिक अत्याचार केला. सदरची बाब पीडितेने तिच्या आईला सांगितली असता फिर्यादीने आरोपीला जाब विचारण्यासाठी गेली. तोपर्यंत आरोपी पळून गेला. त्यानंतर फिर्यादीने सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

या गुन्ह्याचा तपास करून तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक तपासी अधिकारी एन. पी. साळुंखे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र पाठवले. या खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधीश कविता शिरभाते यांच्या न्यायालयात झाली. सरकारी वकिलांनी सदर आरोपीने अत्याचार केला असून, घटनास्थळावरून आरोपी लगेच पळून गेला. लागलीच फिर्यादही देण्यात आली. वैद्यकीय अहवालानुसार सदर गुन्हा आरोपीने केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानुसार न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले.

न्यायालयाने आरोपीला दोषी धरून भा.दं. वि. कलम ३७६ (२ आय), ३७६ ब (जे), ३५४- अ तसेच बाललैंगिक अत्याचार कलम ४, ८ अन्वये दोषी धरून बाललैंगिक अत्याचार कलम ५ (एम) व ६ अन्वये २५ वर्षाची शिक्षा सुनावली.
या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड. प्रकाश जन्नू, आरोपीतर्फे अ‍ॅड. फिरोज शेख यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून महिला पोलिस हवालदार प्यारन नदाफ यांनी काम पाहिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR