नांदेड : मजुरी कामासाठी नांदेड येथून आदिलाबाद येथे गेलेल्या तीन सख्या भावांचा चोप्रा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दि. २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी उघडकीस आली. नांदेड शहरातील नवी आबादी येथील विजय राजु नागलवाड(२२) वर्षे धंदा वाहन चालक व त्याचा भाऊ अकाश राजू नागलवाड(२६) व अक्षय राजू नागलवाड(२४) वर्षे हे तिघेजन आदिलाबाद जिल्ह्यातील तामसी तालुक्यातील नगापुर मंडलमध्ये रोजंदारीच्या कामासाठी गेले होते.
नागापूर येथे राहून आदिलाबाद येथे कामासाठी दररोज ते जात होते. परंतू मंगळवारी कामाला सुटी असल्याने तीघेही जण घरी थांबले होते. त्यांचा साडू भाऊ श्रीनिवास कांबळे हे बाहेर जाऊन येऊ म्हणून निघाले असता पोचिरा नदीमध्ये मासेमारी करण्याच्या उद्देशाने ते सर्वजन गेले. यातील विजय नागलवाड हा नदीपात्रात उतरला तो वाहून जात असल्याचे पाहून अकाश व अक्षय या दोघांनीही पाण्यात उड्या घेतल्या मात्र विजय नागलवाड हा गाळात फसला. त्याला बाहेर काढण्यासाठी दोघांनीही पाण्यात उडी मारल्यानंतर त्यांचाही बुडून मृत्यू झाला.