19.9 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeराष्ट्रीयकेंद्रीय कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ?

केंद्रीय कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्रीय कर्मचा-यांचा महागाई भत्ता वाढणार आहे. लेबर ब्युरोने एआयसीपीआय निर्देशांकाची मे पर्यंतची आकडेवारी जाहीर केली. ज्यामध्ये महागाई भत्त्याबाबतची माहिती दिली. आता जूनचे आकडे जाहीर होणार आहेत. हे आकडे ३१ जुलैला येणार होते. मात्र, त्याला थोडा विलंब झाला आहे. महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

केंद्रीय कर्मचा-यांचा महागाई भत्ता किती वाढणार याचीच सर्वांना उत्सुकता आहे. महागाई भत्त्यात पुन्हा एकदा ३ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. दोन वर्षांत पहिल्यांदाच ३ टक्के वाढ होणार आहे. गेल्या ४ वेळा महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ करण्यात आली. लेबर ब्युरोने महागाई भत्ता ठरवणा-या एआयसीपीआय निर्देशांकाची मे पर्यंतची आकडेवारी जाहीर केली आहे. आता जूनचे आकडे जाहीर होणार आहेत. सध्या महागाई भत्ता ५३ टक्क्यांच्या जवळ पोहोचला आहे.

महागाई भत्ता किती वाढू शकतो, हे एआयसीपीआय निर्देशांकातील आकडे ठरवतात. जानेवारी ते जून २०२४ दरम्यान मिळालेल्या आकड्यांच्या आधारे जुलै २०२४ पासून कर्मचा-यांना किती महागाई भत्ता मिळेल, हे ठरवले जाईल. आतापर्यंत जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचे आकडे आले आहेत.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR