चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात आज पुन्हा एकदा वाघाचा मृत्यू झाल्याने वन्यजीवप्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या ५ दिवसांत चंद्रपूर जिल्ह्यात विविध कारणांमुळे तब्बल ३ वाघांचा मृत्यू झाला आहे.
आज सकाळी सावली तालुक्यातल्या सामदा गावाजवळील एक वाघ मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. गोसे खुर्द कालव्याच्या बाजूला असलेल्या शेतात हा मृत वाघ आढळल्यानंतर वनपथक घटनास्थळी दाखल झाले असून वाघाच्या मृत्यूबाबत तपास सुरू करण्यात आला आहे. मात्र गेल्या पाच दिवसांत ही सलग तिसरी घटना घडल्याने वन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.