राळेगावमध्ये ३४ अल्पवयीन मुली बेपत्ता

यवतमाळ : प्रतिनिधी
सध्या राज्यात महिला अत्याचाराचे अनेक गुन्हे समोर येत आहेत. त्यातच आता यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव शहरातून तब्बल ३४ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मानवी तस्करी आणि अल्पवयीन मुली बेपत्ता होणे ही एक अत्यंत गंभीर आणि थरकाप उडवणारी घटना घडल्याचे समोर आले आहे. राळेगावातील जवळपास ३४ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या असून त्यांना परराज्यात देहव्यापारासाठी विकले जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आमदार अशोक उईके आणि भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्लसिंह चौहान यांनी तातडीने पोलिस प्रशासनाची भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून भाजपचे सातत्याने या प्रकरणावर लक्ष होते. राळेगाव शहरात अल्पवयीन मुलींना बाहेर राज्यात विकणे आणि मानवी तस्करी यांसारखे गंभीर गुन्हे घडत आहेत. याबद्दल प्रशासनाने तातडीने दखल घेणे आवश्यक आहे, असे मत प्रफुल्लसिंह चौहान यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी पोलिस उपविभागीय अधिकारी बन्सल आणि स्थानिक पोलिस निरीक्षकांशी सविस्तर चर्चा करून या प्रकरणाशी संबंधित एक महत्त्वाची ऑडिओ क्लिप देखील पोलिसांकडे सुपुर्द केली आहे.

दोषींवर कठोर कारवाईचे आदेश
या प्रकरणाची तीव्रता पाहता मंत्र्यांनी स्वत: राळेगाव पोलिस स्टेशनला भेट देऊन प्रकरणाचा आढावा घेतला. या तपासात कोणतीही हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही, असा सल्ला अशोक उईके यांनी दिला. आरोपींना लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, पीडित मुलींचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणांनी अधिक गतीने काम करावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Hot this week

गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला अभिनेत्रीचा मृतदेह; अवघ्या ३५ व्या...

मुंबई : मल्याळम चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री रेंजुषा मेनन सोमवारी सकाळी...

सचिन पायलट आणि सारा अब्दुला यांचा घटस्फोट

जयपूर : राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सचिन...

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
'उद्योगाच्या जागेवर शिकवणीचे दुकान? गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्याची इनसाईड स्टोरी!
10:52
Video thumbnail
डॉ. मनोज शिरूरे यांच्या अटकेनंतर CBI ची पुन्हा धाड; पथकाकडून घरच्यांची चौकशी, मोबाईल डेटा रडारवर
01:55
Video thumbnail
CBI च्या कारवाई दरम्यान मोठा खोळंबा, अधिकारी लिफ्टमध्ये अडकल्याने उडाली खळबळ
00:36
Video thumbnail
स्टेबल लाईनवरील रिकाम्या डब्याला आग; नांदेड रेल्वे प्रशासनाची तत्परता, मोठी दुर्घटना टळली
02:08
Video thumbnail
तेलंगणाच्या पोचमपाड धरणाचा नांदेडला फटका! ८ तालुक्यांतील पूरग्रस्त शेतकऱ्यांचा मोर्चा
04:53
Video thumbnail
लातुरात प्रशासकीय सुस्तीविरोधात उद्रेक! भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू
05:16
Video thumbnail
लातुरात 'सीबीआय'चा तिसरा मोठा दणका! तीन तासांच्या चौकशीनंतर डॉ. मनोज शिरुरेंना पुण्यातून अटक
03:12
Video thumbnail
भटक्या कुत्र्यांच्या भीषण हल्ल्यात २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू; संतप्त नातेवाईकांनी मांडला ठिय्या
02:39
Video thumbnail
लातूर उद्योग भवनमधील प्रा. शिवराज मोटेगावकरचे चार ते पाच प्लॉट्स वादाच्या भोवऱ्यात
03:58
Video thumbnail
धर्माबाद तालुक्यात डिझेलचा तीव्र तुटवडा; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
01:59
Video thumbnail
धीरजभैय्या देशमुख यांच्या नेतृत्वात लातूरमध्ये क्रिकेटचा महाकुंभ; विलासराव देशमुख चॅम्पियनशिप २०२६..
02:56
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|डॉक्टरांच्या मुलांसह मोटेगावकरांच्या मुलांसाठी खास क्लास ?CBI च्या चौकशीत उघड
01:49
Video thumbnail
BIG BREAKING : लातूरच्या नारायण नगर परिसरात CBI ची धडक;विद्यार्थ्याने नीट पेपर विकत घेतल्याचा संशय
01:48
Video thumbnail
टेंभुर्णीत भीषण आग! फर्निचर, हार्डवेअरसह इलेक्ट्रॉनिक्सची ३ दुकाने खाक; कोट्यवधींचे नुकसान
01:46
Video thumbnail
हिमायतनगर तालुक्यात पेट्रोल-डिझेलचा प्रचंड तुटवडा; शेतीची कामे रखडल्याने शेतकरी आक्रमक
03:18

Latest news