Homeराष्ट्रीयमोनालिसाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे मिळतील : साध्वी प्राची 

मोनालिसाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे मिळतील : साध्वी प्राची 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
कुंभमेळ्यात व्हायरल झालेल्या मोनालिसा भोसले हिने फरमान खान याच्यासोबत लग्न केले. हा लव्ह जिहाद असल्याचा आरोप केला गेल्याने त्यांचे लग्न वादात सापडले. मोनालिसा आणि तिचा पती फरमान यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला असला, तरी हा वाद थांबलेला नाही. आता साध्वी प्राची आर्या यांनी मोनालिसाची हत्या होईल आणि तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे मिळतील असे म्हटले आहे.

साध्वी प्राची म्हणाल्या, फरमानने हिंदू धर्म स्वीकारून लग्न केले असते, तर आम्ही त्याचे स्वागतच केले असते. पण, त्याने मोनालिसासोबत लव्ह जिहाद केला आहे. मोनालिसा ही माध्यमांनी मोठी केलेली मुलगी आहे. तिला ना लव्ह जिहाद माहीत आहे, ना मदरशांमध्ये दिल्या जाणा-या प्रशिक्षणाबद्दल.

फरमान खान आणि मोनालिसा यांच्या लग्नाबद्दल साध्वी आर्या म्हणाल्या, ‘मोनालिसासोबत लवकरच दगाफटका होईल. जेव्हा तिची कमाई बंद होईल, तेव्हा तिचे ३५ तुकडे मिळतील. मोनालिसाची अवस्थाही निकिता तोमर हत्याकांडासारखीच होईल.’

श्रद्धा वालकरसारखीच तिची हत्या होऊ शकते. तिचा मृतदेह फ्रीजमध्ये मिळेल. हा लव्ह जिहाद आहे. फरमानने हिंदू धर्म स्वीकारायला हवा होता आणि नंतर लग्न करायला हवे होते, असे सांगत साध्वी प्राची म्हणाल्या की, हिंदू कुटुंबातील लोकांनी आपल्या मुलांच्या गळ्यात डुकराचा दात बांधावा जेणेकरून दृष्ट त्यांच्याजवळ येणार नाही.

हिंदू मुलींना फसवून लग्न केले जाते
साध्वी प्राची म्हणाल्या की, मोनालिसा ही मीडियाने मोठी केलेली मुलगी आहे. तिला लव्ह जिहाद आणि मदरशांमध्ये दिल्या जाणा-या प्रशिक्षणाविषयी माहिती नाही. हिंदू मुलींना फसवून त्यांच्यासोबत लग्न केले जाते. त्यानंतर त्यांना धोका दिला जातो. त्यांचे नाते हे समाजासाठी मोठा धोका आहे. येणा-या काळात याचे गंभीर परिणाम होतील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR