23.6 C
Latur
Monday, July 14, 2025
Homeमहाराष्ट्रकोरोना पॉझिटिव्ह असल्यास ५ दिवस गृहविलगीकरणात

कोरोना पॉझिटिव्ह असल्यास ५ दिवस गृहविलगीकरणात

- टास्क फोर्सचा सल्ला - लवकरच नियमावली

मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकार अलर्ट झालेय. टास्क फोर्सच्या सल्ल्यानुसार राज्य सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, कोरोनाची लागण झाल्यास रुग्णांनी पाच दिवस गृहविलगीकरणात राहण्याचा सल्ला महाराष्ट्राच्या कोविड टास्क फोर्सने दिला आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाकडून आज यासंदर्भात नियमावली जारी करण्यात येणार असल्याचे समजते. परदेशातून भारतात येणा-यांवर कोणतेही निर्बंध लावण्यात येणार नसल्याची माहिती मिळतेय. येणा-या सणांच्या काळात पुढील तीन आठवडे महत्त्वाचे असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. जिल्ह्यांमधील रुग्णालय सुविधांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचेही टास्क फोर्सने सांगितलंय. दरम्यान राज्यात कोरोनाची अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या ८६३ वर पोहोचली आहे.

वाढत्या कोरोना रुग्णामुळे राज्य सरकार अलर्ट झाले आहे. आज राज्याच्या आरोग्य विभागाकडून यासंदर्भात नियमावली जारी करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. कोरोनाची लागण झाल्यास रुग्ण विलगीकरण करण्याचा सल्ला टास्क फोर्सने दिली आहे. रुग्ण पॉझिटिव्ह असल्यास घरीच ५ दिवस आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला टास्क फोर्सने दिला आहे. नवे वर्ष अन् सणासुदीच्या काळामुळे पुढील तीन आठवडे महत्वाचे आहेत. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यांमधील हॉस्पिटलायझेशनकडे लक्ष देण्याची गरज असल्याचेही टास्क फोर्सने म्हटले.

कोरोनाची अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या ८६२ वर
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, बुधवारी राज्यात १३८ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर ७५ रुग्णांना उपचारांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण हे९८.१७ टक्क्यांवर पोहोचले आहे. राज्यातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या ८६२ वर पोहचली आहे. राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण ठाण्यात आहेत.ठाण्यात कोरोनाचे २३७ सक्रीय कोरोना रुग्ण आहेत. तर मुंबईमध्ये १३८ आणि पुण्यात १३६ सक्रीय रुग्ण आहेत.

शंभरहून अधिक रुग्ण आढळले
राज्यातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या ८६२ वर पोहचली आहे. बुधवारी राज्यात १३८ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. सर्वाधिक रुग्ण मुंबईमध्ये आढळले. मुंबईमध्ये २० रुग्ण आढळले. नवी मुंबई ११, नाशिक १०, पुणे शहर ९, पिंपरी चिंचवड ९ रुग्ण आढळले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR