28.6 C
Latur
Friday, November 8, 2024
Homeमहाराष्ट्रभंडा-यात एकाच कुटुंबातील ५ जणांना विषबाधा

भंडा-यात एकाच कुटुंबातील ५ जणांना विषबाधा

भंडारा : आपल्यापैकी अनेकांना उरलेलं अन्न फ्रिजमध्ये ठेवून खाण्याची सवय असते. पण तुमची ही सवय जीवावर बेतू शकते. लाखांदूर तालुक्यात एकाच कुटुंबातील पाच व्यक्तींना विषबाधा झाली आहे. त्यांनी फ्रिजमध्ये ठेवलेली शिळी भाजी खाल्ली होती.

फ्रिजमध्ये ठेवलेली भाजी दुस-या दिवशी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांना विषबाधा झाल्याची घटना सरांडी बु. येथे घडली. ताराबाई कुंभरे (६५), शालिनी कुंभरे (४०), गोवर्धन कुंभरे (५१), सुजिता कुंभरे (१४), दुर्गा कुंभरे (११) अशी विषबाधा झालेल्यांची नावे आहेत.

लाखांदूर तालुक्यातील सरांडी बु. येथील ताराबाई कुंभरे यांच्या घरी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात त्यांनी उडदाच्या डाळीच्या वड्यांची भाजी बनविली होती. कार्यक्रमानंतर घरातील सर्वांनी जेवण करून उरलेली भाजी घरातील फ्रिजमध्ये ठेवली होती. सकाळी फ्रिजमध्ये ठेवलेली भाजी गरम करून खाल्ल्याने पाच जणांची प्रकृती बिघडली. ही घटना उघडकीस येताच त्यांना सरांडी बु. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR