नव्या सरन्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी ५ नावांची शिफारस

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश नियुक्त करण्यासाठी पाच नावांची शिफारस केंद्र सरकारकडे पाठवली आहे. यामध्ये चार उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश आणि एक वरिष्ठ महिला वकील यांचा समावेश आहे.

कॉलेजियमने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शील नागू, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संजीव सचदेवा, जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अरुण पल्ली आणि वरिष्ठ वकील व्ही मोहना यांची नावे पाठवली आहेत. ही शिफारस २२ आणि २७ मे रोजी झालेल्या कॉलेजियमच्या बैठकांमध्ये करण्यात आली आहे.

ज्येष्ठ वकील व्ही. मोहना यांच्या नियुक्तीमुळे सर्वोच्च न्यायालयात महिलांचा सहभाग मजबूत होण्याची अपेक्षा आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना या एकमेव महिला न्यायाधीश आहेत. ऑगस्ट २०२१ नंतर कोणत्याही महिलेची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती झालेली नाही. सध्या सर्वोच्च न्यायालयात ३२ न्यायाधीश आहेत. जूनमध्ये न्यायमूर्ती जे.के. माहेश्वरी आणि न्यायमूर्ती पंकज मित्तल यांच्या निवृत्तीनंतर आणखी दोन पदे रिक्त होतील.

न्यायाधीशांची संख्या वाढून ३७ होईल
केंद्रीय मंत्रिमंडळाने ५ मे रोजी सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या ३३ वरून ३७ पर्यंत वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. सरकार संसदेच्या पुढील अधिवेशनात यासंबंधीचे विधेयक सादर करेल. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर १९५६ च्या कायद्यात दुरुस्ती केली जाईल. संविधानाच्या अनुच्छेद १२४(१) नुसार सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचा अधिकार संसदेकडे आहे. कायदा लागू झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे कॉलेजियम नवीन न्यायाधीशांची नावे सरकारला पाठवेल.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|अतिरिक्त फीस किंवा शैक्षणिक साहित्याची सक्ती केल्यास कारवाई. तृप्ती अंधारे ऍक्शन मोडवर.
03:22
Video thumbnail
Latur|ऊस बिलांसाठी शेतकऱ्यांचा एल्गार; उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
01:31
Video thumbnail
Latur Zp|ऑनलाईन प्रणाली बंद, तरीही लातूर जिल्हा परिषदेचे आर्थिक व्यवहार सुरू
01:55
Video thumbnail
Latur|आरटीओ अधिकाऱ्यांवर 35 हजारांची लाच मागितल्याचा व्हिडीओ व्हायरल; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल.
03:19
Video thumbnail
Latur|राजीव नगरमध्ये तुंबलेल्या नाल्यांमुळे दुर्गंधीचं साम्राज्य;नागरिकांचे आरोग्य धोक्यात!
02:50
Video thumbnail
Latur|जळकोटमध्ये खत-बियाण्यांसाठी शेतकऱ्यांची गर्दी;खरीप तयारीला वेग...
02:21
Video thumbnail
धाराशिव: पवनचक्की प्रकल्पातील साहित्य चोरणारी टोळी गजाआड; १० गुन्हे उघड, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त
01:12
Video thumbnail
परभणीत मान्सूनपूर्व वादळाचा धुमाकूळ;मांडाखळीत फळबागा उद्ध्वस्त, वीज खांब कोलमडले, झाड कोसळून बैल ठार
01:18
Video thumbnail
Latur|आमदार आणि आमदार पुत्राच्या त्रासाला कंटाळलेले दोन शेतकरी एकमत डिजिटल स्टुडिओमध्ये
11:51
Video thumbnail
अधिक महिन्यामुळे पंढरपुरात भाविकांची अलोट गर्दी; चंद्रभागा नदीपात्राला पार्किंगचे स्वरूप
02:00
Video thumbnail
लातूरमध्ये भाविकांच्या श्रद्धेला तडा; कोट्यवधींचा निधी पळवणारे किशोर महाराज शिवणीकरांवर गुन्हा दाखल!
06:19
Video thumbnail
Latur|अखेर किशोर महाराज शिवणीकर उर्फ ‘पिस्तुल्या महाराज’ यांच्यावर गुन्हा दाखल
04:45
Video thumbnail
उदगीर-जळकोट महामार्गावर भीषण अपघात; कारच्या धडकेनंतर CNG ऑटोचा स्फोट, रिक्षा जळून खाक, चालक बचावला
00:36
Video thumbnail
Latur|महेश देशमुख इतिहास रचतील;माजी मंत्री आमदार अमित देशमुखांचा दावा
03:49
Video thumbnail
जिंतूर-परभणी महामार्गावर भीषण अपघात; आजी, आजोबांसह १२ वर्षांचा नातू जागीच ठार
01:53

Latest news