23.4 C
Latur
Sunday, October 6, 2024
Homeअंतरराष्ट्रीयइस्रायलच्या हल्ल्यात लेबनॉनमध्ये ५०० लोकांचा मृत्यू

इस्रायलच्या हल्ल्यात लेबनॉनमध्ये ५०० लोकांचा मृत्यू

जेरुसलेम : लेबनॉनमधील इस्रायली हल्ल्यातील मृतांची संख्या २४ मुलांसह ५०० च्या वर पोहोचली आहे. दरम्यान, थेट प्रक्षेपणादरम्यान झालेल्या हल्ल्यात लेबनॉनचा एक पत्रकार जखमी झाला आहे. हल्ला झाला तेव्हा तो खिडकीसमोर बसला होता. इस्रायली हल्ल्यात पत्रकार जखमी होण्याची ही पहिली वेळ नाही. ऑक्टोबर २०२३ रोजी लेबनॉनमध्ये इस्रायली टँकच्या कर्मचा-यांनी पत्रकाराची हत्या केली होती. तर सहा पत्रकारांना जखमी केले होते.

या दरम्यान, पत्रकार सीमेपलीकडून होणा-या गोलाबारीचा व्हिडिओ बनवत असताना इस्रायली बाजूने सलग दोन गोळ्या झाडण्यात आल्या. या दोन हल्ल्यांमध्ये ३७ वर्षीय पत्रकार इसाम अब्दुल्ला ठार झाला आणि २८ वर्षीय क्रिस्टिना असी गंभीर जखमी झाली. इस्रायलच्या सीमेपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या लेबनॉनच्या अल्मा अल-चाब गावाजवळ हा हल्ला झाला.

हिजबुल्लाचे शेकडो तळ उध्दवस्त
इस्रायली सैन्याने सांगितले की, त्यांनी दक्षिण लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या ठिकाणांना तोफखाना आणि रणगाड्यांद्वारे हिजबुल्ला या दहशतवादी गटाच्या शेकडो तळांना उध्दवस्त करण्यात आले. उत्तर इस्रायलमधील पोलिसांनी सांगितले की, हिजबुल्लाने प्रत्युत्तरात शेकडो क्षेपणास्त्रे डागली. इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांचे तुकडे विविध भागात सापडले आहेत. इस्रायलने सोमवारी लेबनॉनवर केलेल्या हवाई हल्ल्यात सुमारे ५०० लोक ठार झाले आणि हजारो लोकांना सुरक्षिततेसाठी पलायन करण्यास भाग पाडले, असे लेबनॉनच्या अधिका-यांनी सांगितले

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR