13.7 C
Latur
Friday, November 14, 2025
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित

महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित

मदतीसाठी संपर्क क्रमांक जारी उत्तराखंडमध्ये अडकले पर्यटक

मुंबई : उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात मुसळधार पाऊस व ढगफुटी झाली. या घटनेमुळे खीरगंगा नदीला मोठा पूर आला व अनेक घरांचे नुकसान झाले आहे. दरम्यान उत्तराखंडमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक उत्तरकाशीमध्ये अडकले होते. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील ११ व इतर जिल्ह्यांतील ४० अशा ५१ पर्यटकांचा समावेश असून हे सर्व पर्यटक सुखरूप असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.

उत्तराखंड मध्ये अडकलेल्या पर्यटकांना आवश्यक मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासन तत्पर असून पर्यटकांची संपर्क करत आहे. यासाठी राज्य शासनामार्फत उत्तराखंड आपत्ती व्यवस्थापन केंद्र व उत्तरकाशी जिल्हा आपत्ती केंद्राशी संपर्क साधला जात असून अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी महाराष्ट्र सदन, दिल्ली यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. आवश्यकतेनुसार राज्यातील जिल्हा प्रशासनाला सूचनाही देण्यात आल्या आहेत. येथील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून पुढील सूचना वेळोवेळी दिल्या जाणार असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळवले आहे.

उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली गावात मंगळवारी ढगफुटीमुळे हाहाकार उडाला. मंगळवारी (दि. ५ ऑगस्ट) दुपारी १:४५ वाजता उत्तरकाशीतील हर्सिल येथील भारतीय लष्कराच्या कॅम्पपासून सुमारे ४ किमी अंतरावर धराली गावात ढगफुटी झाली. यामु­­­ळे भूस्खलन होऊन किमान ४ जणांचा मृत्यू झाला. तर सुमारे ५० लोक बेपत्ता आहेत. ढगफुटी आणि भूस्खलनामुळे पवित्र गंगोत्री धामशी संपर्क तुटला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे पाण्यासोबत मातीचा ढिगारा सगळीकडे पसरला आहे. आर्मी आणि एनडीआरएफ पथके बचावकार्यासाठी तत्काळ घटनास्थळी रवाना झाली.

संपर्क क्रमांक:
राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, महाराष्ट्र : ९३२१५८७१४३ / ०२२-२२०२७९९० / ०२२-२२७९४२२९
राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, उत्त्तराखंड : ०१३५-२७१०३३४ / ८२१

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR