28.6 C
Latur
Saturday, September 14, 2024
Homeधाराशिवधाराशिव जिल्ह्यात ७५ वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार

धाराशिव जिल्ह्यात ७५ वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार

धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव जिल्ह्यातील एका गावातील एका ७५ वर्षीय वृद्ध महिलेवर नराधमाने एकटी गाठून लैंगिक अत्याचार केला. ही अत्याचाराची घटना दि. ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. पीडित वृद्ध महिला शेतातून घराकडे येत होती. या प्रकरणी परंडा पोलिस ठाणे येथे त्या नराधमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धाराशिव जिल्ह्यातील एका गावातील पिडीत ७५ वर्षीय वृद्ध महिला दि. ८ ऑगस्ट रोजी शेतात गेली होती. ती सायंकाळी पाचच्या सुमारास शेतातून घरी येत असताना एका नराधमाने ती एकटी असल्याचा फायदा घेवून तिचा पाठलाग केला. तीला ओढत नेवून तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. यानंतर त्या नराधमाने तु ओरडली अगर घडल्या प्रकाराबद्दल कोणाला सांगितले तर जिवे ठार मारीन, अशी धमकी दिली. या प्रकरणी पीडित महिलेने दि. ८ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवला आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR