28.6 C
Latur
Saturday, September 14, 2024
Homeराष्ट्रीयमध्य प्रदेशमध्ये भिंत कोसळून ८ मुलांचा मृत्यू

मध्य प्रदेशमध्ये भिंत कोसळून ८ मुलांचा मृत्यू

शाहपूर : केरळ, हिमाचल प्रदेश, काश्मीर आदी भागातून भूस्खलनाने हाहाकार मांडलेला असताना मध्य प्रदेशमधून हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. सागर जिल्ह्यातील शाहपूरमध्ये भिंत कोसळून आठ मुलांचा मृत्यू झाला आहे.

श्रावणमासानिमित्त शाहपूरच्या हरदोलमध्ये शिवलिंग निर्माण आणि भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी शिवलिंग बनविण्याचे काम सुरू होते.

शिवलिंग बनविण्यासाठी आठ ते १४ वर्षांची मुले या कार्यक्रमाला गेली होती. यावेळी शेजारील भिंत या मुलांवर कोसळली. ही भिंत ५० वर्षे जुनी होती, असे सांगितले जात आहे. स्थानिक लोकांनी जखमी मुलांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR