18.7 C
Latur
Wednesday, December 17, 2025
Homeमहाराष्ट्रपुण्यातील नवले ब्रीजवर भीषण अपघातात ८ ठार

पुण्यातील नवले ब्रीजवर भीषण अपघातात ८ ठार

गाड्यांनी घेतला पेट; २० गंभीर जखमी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

पुणे : राज्यातील वेगाने वाढणा-या पुणे शहरात भीषण अपघाताची घटना घडली असून ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. शहरातील नवले पुलावर हा अपघात होऊन दोन ते तीन वाहनांनी पेट घेतल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत २० पेक्षा अधिक जण जखमी झाल्याचे समजते, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या गाड्याही नवले ब्रीजवर पोहोचल्या होत्या. अपघातातील जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

शहरातील नवले ब्रीजवर सातत्याने अपघाताच्या घटना घडतात, आज पुन्हा एकदा येथे भीषण अपघाताची घटना घडली. ३ ते ४ गाड्यांची धडक बसल्याने हा अपघात झाला असून दोन कंटेनरच्यामध्ये एक कार जळत असल्याचे दिसून आले. या कारमधून एक कुटुंब प्रवास करत होते, अशीही प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, अपघाताच्या घटनेनंतर अग्निशमन दल व पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. तर, काही काळासाठी नवले पुलासह रस्त्यावरची वाहतूक थांबवण्यात आली होती. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून मदत व बचाव कार्य बराच वेळ सुरू होते.

नवले पुलावरील हा अपघात इतका भीषण होता की, गाड्यांची एकमेकांना धडक झाल्यानंतर दोन ते तीन वाहनांनी पेट घेतला. त्यामध्ये, ८ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी आहेत. या अपघातानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर काही काळासाठी रस्त्यावरची वाहतूकही थांबवण्यात आली होतीे.

 

माजी आमदार धंगेकर आणि वसंत मोरेंनी व्यक्त केला संताप
या पुलावर रमलर लावून आणि कॅमेरे बसवून जमणार नाही, केवळ वाहतूक नियोजन करणे इतकंच काम नाही. तर, पोलिस असणे, सुरक्षा व्यवस्था आणि स्पीड संदर्भातील जे विषय आहेत ते सर्व केले पाहिजे. येथील संपूर्ण रस्ता हा उताराचा आहे, त्यादृष्टीनेही काम केले पाहिजे, अशी प्रतिक्रिया माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी नवले ब्रीजवरील अपघातानंतर दिली. नवले ब्रीजच्या अलिकडे काहीही वाहतूक कोंडी नसते, इथे बसवलेल्या कॅमे-यात कैद वाहनांवर कारवाई होती की नाही, हाही प्रश्न आहे. एनएचयूआयचा हा भोंगळ कारभार आहे, केवळ अपघात झाल्यानंतर नेत्यांचा, आमदार, मंत्र्यांचा पाहणी दौरा होतो. अपघाताच्या विषयावर कुणीही अभ्यासक मार्ग सूचवत नाहीत, असेही मोरेंनी म्हटले. दरम्यान, माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनीही अपघातावर प्रतिक्रिया देत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR