८०० वर्षे जुने शिवमंदिर पाडले

वारंगळ : तेलंगणा राज्यातील वारंगळ जिल्ह्यातून अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली असून खानपूर मंडळातील अशोक नगर भागात ८०० वर्षे जुने शिवमंदीर पाडण्यात आले. त्यानंतर नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली. एका सरकारी इंटिग्रेटेड स्कूलच्या बांधकामासाठी हे मंदिर पाडण्यात आल्याचे अधिका-यांनी सांगितले आहे. परंतु, हे मंदिर कोणतीही पूर्वपरवानगी न घेता पाडण्यात आल्याचा आरोप केला जात असून मंदिर त्याच ठिकाणी पुन्हा काकतीय स्थापत्यशैलीत बांधून मिळावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

हे मंदिर १३ व्या शतकातील काकतीय कालखंडातील असल्याचे सांगितले जाते. मंदिराच्या अवशेषांमध्ये फेब्रुवारी १२३१ मधील एक अत्यंत दुर्मिळ तेलुगू शिलालेख सापडला आहे. या शिलालेखात काकतीय राजा गणपतीदेव यांचा उल्लेख ‘महाराजा’ आणि ‘राजाधिराजुलू’ असा करण्यात आला आहे. हे मंदिर राज्याच्या पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत येत असूनही, कोणतीही पूर्वपरवानगी न घेता ते पाडण्यात आल्याचा आरोप होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नियोजित शाळेच्या जागेचे सपाटीकरण करताना कंत्राटदाराने हे मंदिर पाडण्यात आले. या कारवाईदरम्यान मंदिराचा गाभाराही खोदण्यात आल्याचे समोर आले . ग्रामस्थांचा आरोप आहे की, पुरातत्व विभागाचे नियम धाब्यावर बसवून ही कारवाई करण्यात आली. एका वकिलाने केलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली जात आहे.

लोकप्रतिनिधी, अधिका-यांच्या भेटी
स्थानिक आमदार दोंथी माधव रेड्डी आणि जिल्हाधिकारी सत्या शारदा यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यांनी आश्वासन दिले आहे की, शाळेच्या बांधकामासोबतच शिवमंदिर देखील त्याच ठिकाणी बांधण्यात येईल. इतिहास तज्ज्ञांच्या मते, ज्या मंदिराला बांधायला अनेक वर्षे लागली, ते अवघ्या एका दिवसात पाडण्यात आले. शाळेच्या आवारात हे मंदिर वारसा म्हणून जतन करता आले असते, अशा शब्दांत त्यांनी खंत व्यक्त केली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|महेश देशमुख इतिहास रचतील;माजी मंत्री आमदार अमित देशमुखांचा दावा
03:49
Video thumbnail
जिंतूर-परभणी महामार्गावर भीषण अपघात; आजी, आजोबांसह १२ वर्षांचा नातू जागीच ठार
01:53
Video thumbnail
Latur|माजी तंटामुक्ती अध्यक्षाला लातूर ग्रामीणच्या आमदारांच्या लोकांनी दिल्या धमक्या..
11:06
Video thumbnail
जळकोट शहर व तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी; उकाड्यापासून दिलासा, मात्र शेतकरी चिंतेत!
01:24
Video thumbnail
RCC CLASSES PROTEST|RCC क्लासेस बंद करण्याच्या मागणीसाठी लातुरात मोर्चा...
04:21
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये पेट्रोल पंप परिसरात दुर्दैवी अपघात; ३वर्षीय चिमुकल्याचा चारचाकीखाली सापडून मृत्यू
00:52
Video thumbnail
Nanded|लोह्यात धोंडे जेवणाच्या कार्यक्रमातील नृत्य सादरीकरणाचे व्हिडिओ व्हायरल...
01:46
Video thumbnail
भारताला अंदमानच्या समुद्रात सापडला नैसर्गिक वायूचा मोठा खजिना; देशाचे नशीब बदलणार!
00:39
Video thumbnail
Latur|लातूर कृषी महाविद्यालयात दुर्मिळ वनौषधी बीज बँकेचे उद्घाटन; ५०० हून अधिक वनस्पतींचे संवर्धन!
03:01
Video thumbnail
Latur|लातूरचे कृषी महाविद्यालय बनले ऑक्सिजन हब;महाविद्यालय परिसरात तब्बल २ लाख वृक्षांचे संवर्धन
03:25
Video thumbnail
Latur|आर्ट ऑफ लिव्हिंगचा साडेतीन लाख वृक्षलागवडीचा संकल्प; विद्यार्थ्यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ!
01:41
Video thumbnail
Latur|घरात घुसलेल्या पाण्याने संसार उद्ध्वस्त;महामार्ग विभागाच्या निष्काळजीपणाचा आरोप
01:28
Video thumbnail
Latur|लातुरात १० हजार झाडांचा १० वा वाढदिवस; जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा!
04:33
Video thumbnail
Nanded|उमेदवारी बदलल्यानंतर सुमठाणकरांची सोशल मीडियावर नाराजी?
01:00
Video thumbnail
'विप्रो'च्या माजी महिला अधिकाऱ्याचा इस्लाम स्वीकारण्यासाठी छळ केल्याचा आरोप
01:30

Latest news