८८ देशांनी दाखविला ट्रम्प यांना हिसका

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील देशांवर कर लादून खळबळ उडवून दिली होती. भारतावरही ५० टक्के कर लादण्यात आला होता. मात्र अमेरिकेच्या या टॅरिफचा सर्वात मोठा फटका अमेरिकेला जाणा-या आंतरराष्ट्रीय टपाल सेवांना बसला आहे. युनिव्हर्सल पोस्टल युनियनने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेला जाणारी टपाल वाहतूक ८० टक्क्यांहून अधिक कमी झाली आहे. त्यामुळे याचा परिणाम अमेरिकन नागरिकांवर होताना दिसत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, जगभरातील ८८ देशांमधील टपाल ऑपरेटर्सनी आपल्या सेवा काही काळासाठी किंवा कायमच्या स्थगित केल्या आहेत. सुरुवातील अमेरिकेने लहान वस्तूंवर सूट दिली होती. मात्र २९ ऑगस्टपासून सर्व टपाल सेवांवर कर लावण्याची घोषणा केली होती. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय टपाल सेवा विस्कळीत झाली आहे.

अमेरिकन सरकारच्या या निर्णयामुळे जर्मनीची ड्यूश पोस्ट, ब्रिटनची रॉयल मेल आणि बोस्रिया आणि हर्जेगोव्हिनासह अनेक देशांच्या टपाल सेवांनी अमेरिकेला जाणारे पार्सल घेणे बंद केले आहे. भारत, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, इटली आणि जपानसारख्या देशांनीही अमेरिकेला पार्सल पाठवण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे अमेरिकन नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे.
आकडेवारीनुसार २९ ऑगस्टच्या आधी म्हणजे एका आठवड्यापूर्वीच्या तुलनेत अमेरिकेला जाणारी टपाल वाहतूक आता ८१ टक्क्यांनी कमी झाली. ८८ देशांमधील टपाल ऑपरेटर्सनी वढव ला सांगितले आहे की, टॅरिफच्या निर्णयावर तोडगा निघेपर्यंत अमेरिकेला जाणारी टपाल सेवा आम्ही थांबवली आहे. या ८८ देशांच्या निर्णयाचा आंतरराष्ट्रीय व्यापारासह खाजगी ग्राहकांवरही मोठा परिणाम झाला आहे.

या सर्व प्रकरणावर बोलताना यूनियनचे महासंचालक मासाहिको मेटोकी यांनी सांगितले की, ‘टपाल सेवा पुन्हा सामान्य करण्यासाठी आम्ही जलद तांत्रिक उपाय शोधत आहोत.’ मात्र सेवा कधी पूर्ववत सुरु होईल याबाबत त्यांनी माहिती दिली नाही. यूपीयू ही बर्न (स्वित्झर्लंड) स्थित संस्था आहे, जी १८७४ मध्ये स्थापन झाली होती. या संस्थेत १९२ देशांचा सहभाग आहे. ही संस्था आंतरराष्ट्रीय टपाल सेवांसाठी नियम बनवते आणि सदस्य देशांमध्ये सेवा पोहोचवण्याचे काम करते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये कलावंतांचा अनोखा संघर्ष; सूर आणि तालातून न्यायाची हाक
03:09
Video thumbnail
Big Breaking : पिस्तुल्या महाराजाच्या दीड कोटींच्या बंगल्यावर जप्तीची तयारी!
02:12
Video thumbnail
Latur Protest|सोनम वांगचूक प्रकरणाचे लातूरमध्ये पडसाद; गांधी चौकात घोषणाबाजी
06:07
Video thumbnail
Parbhani|राहुल पाटील यांना सईद खानांचे थेट आव्हान; परभणीचे राजकारण तापले
03:39
Video thumbnail
EXCLUSIVE : पाऊस गायब... पिक वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा जीवघेणा संघर्ष!
02:20
Video thumbnail
उजनीतून सोडलेले पाणी सीना नदीत; लाखो एकर शेतीला मिळणार संजीवनी
00:58
Video thumbnail
पालईगुडा–कुपटी राज्य मार्गावरील पूलांचे काम रखडले; मुसळधार पावसात मार्ग बंद पडण्याची भीती
00:23
Video thumbnail
Nanded|दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात; चिखलीकरांची स्पष्ट भूमिका
01:37
Video thumbnail
Latur Murder|खून झाला... तरी बारवर कारवाई नाही? नेमकं संरक्षण कुणाचं?
02:38
Video thumbnail
Big Breaking : नीट पेपरफुटी प्रकरणात CBI पुन्हा लातुरात; तपासाला वेग!
03:15
Video thumbnail
Latur|पावसासाठी वडवळ नागनाथमध्ये शेकडोंचे नवनाथ पारायण
05:12
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पावसाअभावी खरीप हंगाम संकटात
02:56
Video thumbnail
Latur|रेणापूरमधील बेकरीवर FDA चा छापा; परवाना जागेवरच रद्द
00:56
Video thumbnail
Solapur|धक्कादायक! सोलापूरच्या जलवाहिनीला तडा; लाखो लिटर पाणी वाया
01:04
Video thumbnail
Latur|जन्मभूमीतून खासदारांचा जनता दरबार; नागरिकांच्या समस्या थेट ऐकल्या
04:18

Latest news