पाकमध्ये बस दरीत कोसळून ९ जण ठार

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये रविवारी बस दरीत पडल्याने ९ जणांचा मृत्यू झाला, तर ३० हून अधिक जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काही लोकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांमध्ये चार मुलांचाही समावेश आहे. जखमींमध्ये फिलीपिन्समधील एका महिलेचा समावेश आहे. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस खड्ड्यात पडली आणि उलटली, असे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी हा अपघात झाला. इस्लामाबादहून लाहोरला जाणारी बस पंजाब प्रांतातील चकवाल जिल्ह्यातील बालकासरजवळ दरीत पडली. यावेळी बसमध्ये ४० प्रवासी होते. बसचा टायर फुटल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे हा अपघात झाला. चकवाल जिल्हा आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सईद अख्तर यांच्या मते, या अपघातात ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. मृतांमध्ये बस चालकाचाही समावेश आहे. अपघातात जखमी झालेल्या सर्व लोकांना चकवाल येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. चकवालच्या उपायुक्त सारा हयात आणि सहाय्यक आयुक्त झीशान शरीफ यांनी जिल्हा आरोग्य मुख्यालय रुग्णालयात पोहोचून जखमींची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी डीसी हयात यांनी जखमींना सर्व शक्य वैद्यकीय सुविधा देण्याचे निर्देश दिले.

मृतांमध्ये ४ मुलांचाही समावेश
घटनेची माहिती मिळताच, बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि दरीत पडलेल्या लोकांना बाहेर काढले. मृतांमध्ये चार मुलेही असल्याचे सांगण्यात येत आहे, त्यापैकी एक बाळ अवघ्या आठ महिन्यांचे आणि दुसरे एक वर्षाचे होते. यासोबतच १४ वर्षे आणि २ वर्षे वय असलेल्या दोन बहिणींचाही मृतांमध्ये समावेश आहे, तर त्यांची आई जखमी आहे. तर परदेशी महिलेचे नाव एमी डेला क्रूझ असून ती फिलीपिन्सची आहे. तिचे लाहोरमध्ये लग्न झाले होते. १२ जखमींपैकी चार जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना रावळपिंडी येथील रूग्णालयात पाठवण्यात आले आहे.

Hot this week

गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला अभिनेत्रीचा मृतदेह; अवघ्या ३५ व्या...

मुंबई : मल्याळम चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री रेंजुषा मेनन सोमवारी सकाळी...

सचिन पायलट आणि सारा अब्दुला यांचा घटस्फोट

जयपूर : राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सचिन...

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
'उद्योगाच्या जागेवर शिकवणीचे दुकान? गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्याची इनसाईड स्टोरी!
10:52
Video thumbnail
डॉ. मनोज शिरूरे यांच्या अटकेनंतर CBI ची पुन्हा धाड; पथकाकडून घरच्यांची चौकशी, मोबाईल डेटा रडारवर
01:55
Video thumbnail
CBI च्या कारवाई दरम्यान मोठा खोळंबा, अधिकारी लिफ्टमध्ये अडकल्याने उडाली खळबळ
00:36
Video thumbnail
स्टेबल लाईनवरील रिकाम्या डब्याला आग; नांदेड रेल्वे प्रशासनाची तत्परता, मोठी दुर्घटना टळली
02:08
Video thumbnail
तेलंगणाच्या पोचमपाड धरणाचा नांदेडला फटका! ८ तालुक्यांतील पूरग्रस्त शेतकऱ्यांचा मोर्चा
04:53
Video thumbnail
लातुरात प्रशासकीय सुस्तीविरोधात उद्रेक! भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू
05:16
Video thumbnail
लातुरात 'सीबीआय'चा तिसरा मोठा दणका! तीन तासांच्या चौकशीनंतर डॉ. मनोज शिरुरेंना पुण्यातून अटक
03:12
Video thumbnail
भटक्या कुत्र्यांच्या भीषण हल्ल्यात २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू; संतप्त नातेवाईकांनी मांडला ठिय्या
02:39
Video thumbnail
लातूर उद्योग भवनमधील प्रा. शिवराज मोटेगावकरचे चार ते पाच प्लॉट्स वादाच्या भोवऱ्यात
03:58
Video thumbnail
धर्माबाद तालुक्यात डिझेलचा तीव्र तुटवडा; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
01:59
Video thumbnail
धीरजभैय्या देशमुख यांच्या नेतृत्वात लातूरमध्ये क्रिकेटचा महाकुंभ; विलासराव देशमुख चॅम्पियनशिप २०२६..
02:56
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|डॉक्टरांच्या मुलांसह मोटेगावकरांच्या मुलांसाठी खास क्लास ?CBI च्या चौकशीत उघड
01:49
Video thumbnail
BIG BREAKING : लातूरच्या नारायण नगर परिसरात CBI ची धडक;विद्यार्थ्याने नीट पेपर विकत घेतल्याचा संशय
01:48
Video thumbnail
टेंभुर्णीत भीषण आग! फर्निचर, हार्डवेअरसह इलेक्ट्रॉनिक्सची ३ दुकाने खाक; कोट्यवधींचे नुकसान
01:46
Video thumbnail
हिमायतनगर तालुक्यात पेट्रोल-डिझेलचा प्रचंड तुटवडा; शेतीची कामे रखडल्याने शेतकरी आक्रमक
03:18

Latest news