Homeराष्ट्रीयतामिळनाडूत ९ पोलिसांना मृत्युदंड

तामिळनाडूत ९ पोलिसांना मृत्युदंड

पोलिस कोठडीतील हत्या प्रकरणी न्यायालयाचा निकाल

चेन्नई : वृत्तसंस्था
२०२० मध्ये गाजलेल्या सथानकुलम पोलिस कोठडीतील हत्या प्रकरणात न्यायालयाने निकाल दिला आहे. मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने या प्रकरणात तामिळनाडू पोलिस दलातील ९ जणांना दोषी धरले आहे. त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. ही घटना अतिदुर्मीळ असल्याचे न्यायालयाने निकाल देताना म्हटले आहे. पोलिसांनी केलेला गुन्हा अतिशय निर्घृण असल्याचे न्यायालयाने निकालात नमूद केले आहे.

या प्रकरणी सहा वर्ष सुनावणी चालली. प्रथम अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती जी. मुथुकुमारन यांनी या प्रकरणी निकाल दिला. त्यांनी सगळ््या नऊ आरोपींना हत्या आणि अन्य संबंधित कलमांच्या अंतर्गत दोषी धरले. हे प्रकरण आत्यंतिक क्रूरता आणि सत्तेच्या दुरुपयोगाचे उदाहरण असल्याचे न्यायमूर्तींनी निकालात म्हटले.

ही घटना तुतीकोरिन जिल्ह्यातील सथानकुलमशी संबंधित आहे. इथे राहणारे व्यापारी पी. जयराज आणि त्यांचा मुलगा बेन्निक्स यांचा पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू झाला. दोघांना १९ जून २०२० रोजी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यावेळी कोरोना संसर्गामुळे देशभरात लॉकडाऊन सुरु होता. लÞॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी बाप-लेकाला ताब्यात घेतले होते. मोबाईल अ‍ॅक्सेसरीजचे दुकान ठरलेल्या वेळानंतरही सुरुच ठेवल्याचा आरोप त्यांच्यावर होता. पोलीस कोठडीत बाप, लेकांना बेदम मारहाण करण्यात आल्याचे तपासातून समोर आले. त्यामुळे त्यांना गंभीर जखमा झाल्या. त्यामुळे अतिरक्तस्राव झाला. हेच त्या दोघांच्या मृत्यूचे कारण ठरले. या घटनेनंतर देशभरात आक्रोश पाहायला मिळाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR