मुंबई : प्रतिनिधी
दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री समंथा रुथ प्रभू पुन्हा एकदा विवाहबद्ध झाल्याची बातमी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने दिग्दर्शक राज राज निदिमोरुसोबत लग्न केले आहे. कोईमत्तूर येथील इशा फाऊंडेशन याठिकणी त्यांचा विवाह हिंदू पद्धतीने झाल्याचे म्हटले जात आहे.
निर्माते व दिग्दर्शक राज निदिमोरु हे लेखक देखील आहेत. गेल्या महिन्यांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू होती. मात्र, नुकतेच समोर आलेल्या काही खासगी फोटोंनी या चर्चांवर शिक्कामोर्तब केल्याची भावना फॅन्समध्ये दिसून येते.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये समंथा पारंपरिक लाल सिल्क साडीत दिसत असून, तिच्या जवळ राज निदिमोरु पारंपरिक वेषात हसत उभे असल्याचे दिसते. या फोटोंमध्ये मंदिरे, पूजा विधी आणि काही जवळच्या लोकांची उपस्थिती दिसत आहे. त्यामुळे हे फोटो विवाहसोहळ्यातील असल्याचे दिसते.
समंथा आणि राज यांच्यातील जवळीक ‘द फॅमिली मॅन’ या सिरीजपासून दिसू लागली होती, अशी चर्चे होती. दोघेही अनेकदा एकत्र दिसत असल्यानं त्यांच्या नात्याबद्दल तर्क-वितर्क सुरू झाले होते. मात्र दोघांनीही कधीही हे नाते उघडपणे मान्य केले नव्हते. त्यामुळे हे फोटो समोर येताच सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

