लातूर : प्रतिनिधी
तालुक्यातील वैशालीनगर निवळी येथील विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांचा सोलापूर येथील इंचगिरी महाराज मठाच्या मठाधीश परमपूज्य साध्वी पुष्पलता पाटील महाराज यांच्याकडून आदर्श माता म्हणून स्वयं लिखित भुरक्षायज्ञ पुस्तक देऊन गौरविण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुनीताताई अरळीकर, विलास सहकारी साखर कारखान्यांच्या माजी संचालिका श्रीमती विमलताई राजासाहेब पाटील, दौलतराव पाटील उपस्थित होते. या भेटीदरम्यान चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी सोलापूर येथील इंचगिरी महाराज मठाच्या मठाधीपती परम पूज्य साध्वी पुष्पलता पाटील महाराजांसोबत विविध सामाजिक, धार्मिक आणि विकासात्मक विषयावर सविस्तर व रचनात्मक चर्चा केली. त्यानंतर सोलापूर येथील इंचगिरी महाराज मठाच्या मठाधीश परमपूज्य साध्वी पुष्पलता पाटील महाराज, सुनिताताई अरळीकर, श्रीमती विमलताई राजेसाहेब पाटील, दौलत बाळासाहेब पाटील यांनी विलास बागेत जाऊन विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या समाधीचे दर्शन घेतले.

