उदगीर : प्रतिनिधी
उदगीर नगरपरिषदेच्या निवडणुकीतील काँग्रेस महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. अंजुम कादरी आणि नगरसेवक पदाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ दि. १ डिसेंबर रोजी सायंकाळी माजी आमदार तथा लातूर जिल्हा बँकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख यांचा रोडशो झाला. या रोड शोला मोठ्या प्रमाणात मतदार, नागरिकातून प्रतिसाद मिळाला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून रोडशो सुरू झाला आणि डॉ. आंबेडकर पुतळा, हनुमान कट्टा, चौबरा पोलिस स्टेशन येथून जात महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रोड शोची सांगता झाली. यावेळी श्रीमती लक्ष्मीताई भोसले, ट्वेन्टीवन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस कल्याण पाटील, शीलाताई पाटील, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. अंजुम कादरी, शहराध्यक्ष मंजूरखॉ पठाण, प्रीतीताई भोसले, मधुकर एकुरकेकर, पवार, अहमद सरवर, आशिष पाटील राजूरकर, चंदण पाटील नागराळकर, बबिताताई भोसले, राजकुमार भोसले, सोनू आदर्श पिंपरे, विवेक जाधव, लकी पाटील, ओम गाजरे, श्रीकांत पाटील, संजय पवार, संदीप पाटील, ज्ञानोबा गोडभरले, दत्ता सुरनर, महेताब खलील हाश्मी, सचिन केंद्रे, संजय काळे, रामेश्वर बिरादार यांची उपस्थिती होती.

